नेहे कुटुंबियांचा अडीच लाखांचा ढेवज लुटला - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 30, 2021

नेहे कुटुंबियांचा अडीच लाखांचा ढेवज लुटला

 सावज शोधण्यासाठी चोरट्यांची धावाधाव

नेहे कुटुंबियांचा अडीच लाखांचा ढेवज लुटला


बेलापुर - 
श्रीरामपुर बेलापुर रोडवर असलेल्या ओम साई पेट्रोल पंपासमोर राहत असलेल्या नेहे यांच्या घरावर दरोडा टाकून चोरट्यांनी घरातील सोन्याची अंगठी, पोत गळ्यातील मनीमंगळसूत्र, कानातील झुबे असे चार तोळे दागीने व 57 हजार रुपये रोख घेवुन चोरट्यांनी अवघ्या दहा मिनीटात जवळपास अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
या बाबत मिळालेली माहीती अशी की सर्व प्रथम चोरट्यांनी प्रकाश पाटील नाईक याच्या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला परंतु आवाजाने युवराज नाईक यांना जाग आली. त्यांनी तातडीने घरातील सर्व लाईट लावले त्यामुळे चोरट्यांनी तेथुन काढता पाय घेतला. त्यानंतर चाँदनगर येथे प्रवेश केला स्थानीक नागरीकांनी चोरट्यांना पहाताच पोलीसांना फोन केला. पोलीस गाडीच्या सायरनच्या आवाजामुळे चोरटे तेथुन पुढे सरकले. त्या नंतर नवले वस्तीवरील दादा कुताळ यांच्या वस्तीवर ते गेले. तेथेही लोक जागे असल्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा ओम् साई पेट्रोल पंपासमोर राहत असलेल्या बाळासाहेब नेहे यांच्या घराकडे आपला मोर्चा वळवीला. तेथे त्यांनी पाठीमागील दरवाजाला लाथ मारली. दोन ते तीन लाथात तो लाकडी दरवाजा उघडला गेला. चार जणांनी घरात प्रवेश केला. एक जण बाहेर पहारा देत होता. घरात बाळासाहेब नेहे व त्यांची पत्नी पुष्पा हे दोघेच होते त्यांना एका बाजुला बसवुन चोरट्यांनी घरात उचका पाचक केली.
चोरटे मराठीत बोलत होते. पुष्पा नेहे यांच्या कानातील दागीना लवकर निघाला नाही त्या वेळी निघत नसेल तर राहु द्या काढु नका असेही दरोडेखोर म्हणाले.
पावणे तीन वाजता उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना दादा कुताळ यांनी चोर आल्याचे कळविले. त्यामुळे त्यांनी तातडीने ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे संदेश दिला परंतु तोपर्यत चोरटे आपले काम फत्ते करुन पळून गेले. घटना घडताच काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यानंतर कुऱ्हे वस्तीकडे कुत्री भुंकण्याचा आवाज आल्यामुळे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे गणेश भिंगारदे पोपट भोईटे निखील तमनर हरिष पानसंबळ हे पोलीस त्या दिशेने गेले. परंतु तोपर्यत दरोडेखोर पसार झाले होते. काही वेळातच पोलीस निरीक्षक संजय सानप फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. अहमदनगर गुन्हा अन्वेषनची टिम ही घटनास्थळी पोहोचली. श्वानपथक तसेच ठसे तज्ञांनाही बोलविण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनीही घटनास्थळी भेट दिली.

No comments:

Post a Comment