25 वर्षापासून पायात चप्पल न घालणार्‍या मनसेच्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 17, 2021

25 वर्षापासून पायात चप्पल न घालणार्‍या मनसेच्या.

 25 वर्षापासून पायात चप्पल न घालणार्‍या मनसेच्या.

पोपट पाथरेना निवडून द्या मनसेचे आवाहन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार पोपट पाथरे हे अहमदनगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक नऊ क मधून निवडणूक लढवत आहेत त्यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ तसेच जिल्हा सचिव नितीन भुतारे हे प्रचारात सक्रिय झाले असून पोपट पाथरे यांच्या प्रचाराला वेग वाढला आहे शहराच्या विकासासाठी पंचवीस वर्षापासून पायात चप्पल घातलेली नसलेला उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारी करत आहे. या मनसेच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे असे आवाहन मनसेचे सचिन डफळ व नितीन भुतारे यांनी केले आहे.
अशा वेगळ्या प्रकारचे व्रत करणारा उमेदवार हा स्वाभिमानी असून गरीब घराण्यातील आहे त्यामुळे या उमेदवारांची चर्चा या भागातच तसेच शहरात मोठ्या प्रमाणात होत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सिद्धार्थनगर नाथांच्या मंदिरात नारळ फोडून त्या भागात प्रचार करण्यात आला मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी सिद्धार्थनगर सर्जेपुरा बागडपट्टी तोफखाना बालिकाश्रम रोड या भागात विविध ग्रुप द्वारे प्रचारात सक्रिय झाले आहेत त्यामुळे ही लढत शिवसेना भाजप विरुद्ध मनसे अशी तयार होताना दिसत आहे.
या प्रचाराला मनसेचे उपशहर अध्यक्ष संकेत व्यवहारे, संतोष साळवे, तुषार हिरवे, अशोक दातरंगे, अभिनय गायकवाड, गणेश मराठे, गणेश शिंदे, दीपक दांगट, परेश पुरोहित यांच्यासह सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment