विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहे : योगेश गलांडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, October 4, 2021

विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहे : योगेश गलांडे

 विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहे : योगेश गलांडे

सुरज गुंजाळ यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल स्वराज्य कामगार संघटना व सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना करियर करण्यासाठी  विविध संधी उपलब्ध आहे. या संधीचे सोने करण्यासाठी ध्येय निश्चित करणे गरजेचे आहे. मेहनत व चिकाटीच्या जोरावर यशाचे शिखर नक्कीच गाठता येते. सुरज गुंजाळ यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत 353 वी रँक मिळवली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील सुरज गुंजाळने कमी वयात खड-  अधिकारी होण्याचा मान मिळवला ही बाब कौतुकास्पद आहे. इतर विद्यार्थ्यांनीही सुरज गुंजाळ या विद्यार्थ्याचे  अनुकरण करून आपल्या आवडीच्या शिक्षण क्षेत्रामध्ये भरारी घ्यावी. सुरज चे वडील भाऊसाहेब गुंजाळ हे नगरच्या एमआयडीसी मध्ये खाजगी कंपनीत नोकरी करीत असू्न आई शोभा गुंजाळ गृहिणी आहे. या हलाखीच्या परिस्थितीतही एवढे मोठे यश संपादन करणे कठीण असल्याचे असे प्रतिपादन स्वराज्य कामगार संघटना व सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश गलांडे यांनी केले.
नवनागापूर गजानन कॉलनी येथील सुरज भाऊसाहेब गुंजाळ याने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत 353 वी  रँक  मिळवल्याबद्दल स्वराज्य कामगार संघटना व स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करताना अध्यक्ष योगेश  गलांडे, नवनागपूर सरपंच बबनराव डोंगरे, मा.पंचायत समिती सदस्य  राजू  शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य दीपक गीते, शंकर शेळके, सुनील  शेवाळे, राम घाडगे, प्रदीप कारंडे, विवेक घाडगे, आमोल शेवाळे, नरेश शेळके, काव्हाणे मामा,  आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here