जिजाऊ नगरमध्ये नगरसेवक शामभाऊ नळकांडे यांचेकडून गुणवंतांचा सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, October 17, 2021

जिजाऊ नगरमध्ये नगरसेवक शामभाऊ नळकांडे यांचेकडून गुणवंतांचा सत्कार

 जिजाऊनगरमधे नगरसेवक शामभाऊ नळकांडे यांचेकडून गुणवंतांचा  सत्कार



    नगरी दवंडी

अहमदनगर -नगर कल्याण रोडवरील जिजाऊनगर येथे तेथील शिक्षकवृंद व प्रभागाचे विदयमान नगरसेवक शामभाऊ नळकांडे यांच्या संयुक्त विदयमाने क्रिडा प्रकारातील यशवंत व स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विदयार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम उत्साहात पार पडला . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रभागाचे विदयमान नगरसेवक शामभाऊ नळकांडे उपस्थित होते .

         जिजाऊनगरमधील सर्वच नागरीक मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांचा शारिरीक व मानसिक विकास होण्यासाठी जागरुक असतात . याचाच परीपाक म्हणून येथील विदयार्थी शैक्षणिक व क्रिडा या दोन्ही प्रकारात शहराचे नाव राज्यच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर झळकावत आहेत .

            नुकत्याच झालेल्या विविध शासकीय व शालाबाह्य परीक्षांमधे तसेच राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील क्रिडा स्पर्धांमधे विदयार्थ्यांनी नेत्रदिपक यश मिळविले . नुकत्याच औरंगाबाद येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धा पार पडल्या यामधे १६ वर्ष वयोगटामधे चि .ओम करांडे यास गोल्ड मेडल , १४ वर्ष वयोगटामधे चि .प्रणव धामणे यास सिल्व्हऱ मेडल तसेच मुलींच्या १६ वर्ष वयोगटामधे कु . अपर्णा गोरे हीस ब्राँझ मेडल मिळाले . या तिनही विदयार्थ्यांची निवड २५ नोव्हेंबर रोजी हरीयाणा येथे राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या सायकलिंग स्पर्धोसाठी झाली .तसेच मागील वर्षी झालेल्या स्कॉलरशिप परीक्षेमधे कु .सायली तांबे इ .८ वी राज्यात १७ वी , समर्थ कुलट इ .८ वी जिल्हा गुणवत्ता यादी , कु . साक्षी तांबे  इ .८ वी जिल्हा गुणवत्ता यादी तसेच कु . वैष्णवी नरवडे इ .७ वी N.T.S.E परीक्षेत राज्यात तिसरी  , इ .५ वी स्कॉलरशिप परीक्षेत चि . अद्वैत गहांडुले व कु . अश्लेषा गहांडुले जिल्हा गुणवत्ता यादीत आले .

      कु . साक्षी  नरसाळे हीने आखिल भारतीय विदयार्थीपरिषद आयोजित नॅशनल लेव्हल क्वीझ कॉम्पीटीशन मधे राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक मिळवला . तसेच प्रतिक झावरे याने सी .ई.टी. परीक्षेत 99.21 पर्सेंटाईल मिळवून पी .आय.सी.टी. कॉलेजला निवड , तसेच नेपाळ येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कुमार गट फुटबॉल संघाने द्वितीय क्रमांक मिळवला या संघात सहभागी असलेला चि .ओंकार नरवडे तसेच जिजाऊनगर मधील नव्याने पुढे येणारी कमावती पिढी कु . प्राची झावरे व चि .सौरभ झावरे यांनी बी .ई. च्या कॅम्पस मुलाखतीतून पुणे येथील नामांकीत आय.टी. कंपनीमधे नोकरी प्राप्त केली याबद्दल सर्वांच कौतुक आणि सन्मान करण्यात आला .

          नगरसेवक सन्माननिय शामभाऊ नळकांडे यांच्या हस्ते वरील सर्व गुणवंतांचा फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला . यावेळी बोलताना सन्माननिय शामभाऊ नळकांडे म्हणाले की जिजाऊनगरमधे नेहमीच सातत्याने सामाजिक एकोपा दर्शवणारे उपक्रम राबविले जातात याच उपक्रमातून विदयार्थांना प्रेरणा मिळत असते व सुसंस्कृत पिढी तयार होत असते .विदयार्थ्याच्या या यशामुळे प्रभागाचे , शहराचे व राज्याचे नाव देशपातळीवर झळकत आहे . त्यांच्यातील निष्ठा , चिकाटी व जिद्द हे गुण अंगीकारण्यासारखे आहेत . यातूनच मला देखील प्रभागात काम करण्यास प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .लवकरच जिजाऊनगर परिसरातील मुलभूत सोयीसुविधांबद्दल पाठपुरावा करून सर्व समस्या सोडविल्या जातील अशी ग्वाही त्यांनी दिली . सर्व विदयार्थ्यांना पुढील यशासाठी त्यांच्या परिवारा तर्फे व समस्त कल्याणरोड परिसरातील नागरीकांतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या .

           कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री . सुनिल नरसाळे सर यांनी केले . तर सूत्रसंचालन संजय झावरे सर यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री . राजाराम झावरे सर , श्री . सुनिल कुलट सर , श्री . सुनिल रायकर सर, श्री . दत्तात्रय नरवडे सर, श्री . जालिंदर गोरे सर , श्री . दत्तात्रय धामणे सर , श्री . अंबादास तांबे सर , श्री .विवेक गहांडुले सर , श्री .बेरड सर , श्री . रावळे सर, श्री . सांगळे सर यांनी विशेष परिश्रम घेतले .आलेल्या पाहुण्यांचे व जमलेल्या सर्वांचे आभार श्री . सुनिल कुलट सर यांनी मानले .

No comments:

Post a Comment