सावेडी जॉगिंग ट्रॅक मैदानाची दुरावस्था. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, October 2, 2021

सावेडी जॉगिंग ट्रॅक मैदानाची दुरावस्था.

 सावेडी जॉगिंग ट्रॅक मैदानाची दुरावस्था.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने मनपा आयुक्तांना निवेदन..



नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पथदिवे नसल्याने अंधार.. वाढलेले गवत.. डासांची गुनगुन.. सर्वत्र घाणीचे साम्राज्य.. ही स्थिती आहे. शहरातील महत्त्वाचे सावेडी जॉगिंग ट्रॅक मैदानाची रोज हजारोंच्या संख्येने या मैदानात जेष्ठ नागरिक, महिला, युवक व्यायामासाठी येत असताना नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. महापालिकेने सदर जॉगिंग ट्रॅक मैदानामध्ये लक्ष घालून विविध समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केली आहे.
शहरातील एकमेव अत्यंत महत्त्वाचे सावेडी जॉगिंग ट्रॅक मैदान आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, महिला,युवक हजारोच्या संख्येने व्यायामासाठी येत असतात परंतु या ठिकाणी कुठलीही सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे या मैदानामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे यामध्ये विशेष म्हणजे या ठिकाणी शौचालय उपलब्ध नाही त्यामुळे नागरिकांनाची गैरसोय निर्माण झाली. या ठिकाणी पथदिवे नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याच बरोबर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी मैदानामध्ये साचले जाते व मैदानात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे त्यामुळे या मैदानात डासाची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे नागरिकांना साथीच्या आजारांना सामोरे जावे लागतं आहे. यावेळी शुभम तारळकर, अक्षय मिरपगार,अमर सैंदर, अथर्व घुले, ऋषीकेश खटावकर, बबलु गुलदगड, विक्की मोरे, सुरज ठोकळ, ऋग्वेद कुलकर्णी,गणेश चापे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment