डॉ. चंदनशिवेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाला नगर शहरात ओळख निर्माण होईल - किरण काळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, October 4, 2021

डॉ. चंदनशिवेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाला नगर शहरात ओळख निर्माण होईल - किरण काळे

 डॉ. चंदनशिवेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाला नगर शहरात ओळख निर्माण होईल - किरण काळे

काँग्रेस सांस्कृतिक विभाग शहर जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. बापू चंदनशिवे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रा. डॉ. बापू चंदनशिवे यांचे सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील योगदान नगर शहराच्या वैभवात भर घालणारे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर शहर काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाला नवी ओळख नगर शहरात मिळेल असा मला विश्वास आहे, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
डॉ.चंदनशिवे यांची नगर शहर काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी विधिमंडळ पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या मान्यतेने सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षा तथा सेन्सॉर बोर्डाच्या सदस्य विद्याताई कदम यांनी मुंबईतून नियुक्ती केली आहे. डॉ.चंदनशिवे यांना काळे यांच्या हस्ते काँग्रेस कार्यालय नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. किरण काळे यांनी डॉ. चंदनशिवे यांच्या नावाची शिफारस ना. थोरात, प्रदेश काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाकडे केली होती. त्यानंतर चंदनशिवे यांची मुंबईतून नियुक्ती करण्यात आली आहे. काळे यांच्या हस्ते शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने डॉ. चंदनशिवेंचा सत्कार करण्यात आला. डॉ.चंदनशिवे हे शहर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहेत.
यावेळी शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, क्रिडा काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विशाल घोलप, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अजुभाई शेख, शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, राहुल गांधी विचारमंच शहराध्यक्ष सागर इरमल, अजयभाऊ मिसाळ, महिला काँग्रेसच्या उषाताई भगत, माजी नगरसेविका जरिना पठाण, सेवादल महिला शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, शकीला शेख, राणीताई पंडित, शहर जिल्हा सरचिटणीस इम्रान बागवान, विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष सुजीत जगताप, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे, अभिजित तरोटे आदी उपस्थित होते.
डॉ.चंदनशिवे हे गेली 12-13 वर्षांपासून अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयातील मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असून त्यांनी सुमारे 9 वर्ष विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. चंदनशिवे म्हणाले की, किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरातील सांस्कृतिक क्षेत्रातील विविध घटकांना संघटित करण्याचे काम मी करणार आहे. डॉ.चंदनशिवे यांच्या निवडीबद्दल महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले, सांस्कृतिक कार्य मंत्री ना.अमित देशमुख, आ.डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, ज्येष्ठ साहित्यिक आ.लहू कानडे, ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधाताई नागवडे, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर आदींनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here