स्व.दिलीप गांधी यांचे विकासकामांचे स्वप्न मी पूर्ण करणार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, October 2, 2021

स्व.दिलीप गांधी यांचे विकासकामांचे स्वप्न मी पूर्ण करणार

 स्व.दिलीप गांधी यांचे विकासकामांचे स्वप्न मी पूर्ण करणार

केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांचे आश्वासन


नगर –
माझे स्नेही असलेले स्व.दिलीप गांधी यांनी खूप मोठे विकास कामे केली आहेत. विशेषतः नगरच्या उड्डाणपुलासाठी व रस्त्यांच्या कामासाठी त्यांचा वारंवार पाठपुरावा माझ्याकडे होता. त्यांनी सुचवलेले सर्व कामे मी पूर्ण करून त्यांचे विकासकामांचे स्वप्न मी पूर्ण करणार आहे. मात्र झालेला हा विकास पाहण्यास ते आपल्यात नाहीत. जेवणाचे पूर्ण ताट वाढून तयार आहे पण ते नसणार याचे मला दु:ख होत आहे. गांधी परिवाराच्या व सुवेंद्रच्या मी कायम पाठीशी असणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

          केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज नगरला आले असता त्यांनी स्व.दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी जावून गांधी परिवाराची भेट घेतली. स्व.गांधी यांच्या फोटोस अभिवादन केले. श्रीमती सरोज गांधी, देवेंद्र गांधी, सुवेन्द्र गांधी व स्वानंद नवसारीकार यांच्याशी त्यांनी संवाद साधला. यावेळी मोठ्यासंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अमर रेहे अमर रहे दिलीप गांधी अमर रहे... अशा घोषण यावेळी उपस्थितांनी दिल्या.

          श्रीमती सरोज गांधी म्हणाल्या, दिलीप गांधी यांना नितीन गडकरी यांनी आयुष्यभर साथ दिली. त्यांच्या प्रत्येक कामात सहकार्य केले. याबद्दल आभार मानते.  

          सुवेन्द्र गांधी यांनी मंत्री गडकरी यांना निवेदन दिले, ते म्हणाले, नगर शहरातील उड्डाणपूल व जिल्ह्यातील विकासाचे स्वप्न माझ्या वडिलांनी पहिले आहे. त्यांनी सुचवलेला उड्डाणपूल आपल्यामुळेच पूर्ण होत आहे. मात्र स्व.दिलीप गांधी यांनी सुचवल्याप्रमाणे हा उड्डाणपूल महानगरपालिका कार्यालया पर्यंत होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण विषेश निधी मंजुर करावा.

No comments:

Post a Comment