1 लाख 32 हजार रुपये किमतीचा अवैध गावठी दारूसाठा जप्त. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 8, 2021

1 लाख 32 हजार रुपये किमतीचा अवैध गावठी दारूसाठा जप्त.

 1 लाख 32 हजार रुपये किमतीचा अवैध गावठी दारूसाठा जप्त.

4 आरोपीस अटक; गुन्हे दाखल.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्यात काल रोजी विशेष मोहिम राबवून 4 ठिकाणी छापे टाकून एकूण 1 लाख 32 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये गावठी दारु तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन, गावठी हातभट्टीची दारु व मोटार सायकल जप्त करुन एकूण चार आरोपीं विरुध्द पारनेर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र राज्य दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. ही कारवाई अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल व नगर ग्रामिणचे उपविभागीय पोलीस अधीकारी, अजित पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ भाऊसाहेब काळे, दत्तात्रय हिंगडे, पोकॉ राहूल सोळंके, रोहिदास नवगिरे, आकाश काळे, चालक संभाजी कोतकर यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment