‘शिर्डी’ हा नवा जिल्हा व्हावा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 13, 2021

‘शिर्डी’ हा नवा जिल्हा व्हावा.

 ‘शिर्डी’ हा नवा जिल्हा व्हावा.

भाजपचे भाऊसाहेब वाघचौरेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
मुख्यमंत्री ठाकरे यांनी नुकतीच मुंबई येथे एक बैठक घेतली होती. त्यात शिर्डी विमानतळालगत एक शहर वसविण्याचे आदेश दिले होते. साईबाबांच्या समाधी मुळे शिर्डी हे जागतिक कीर्तीचे तीर्थक्षेत्र बनले आहे.  नवीन जिल्हा शिर्डी विमानतळाजवळ होणार असून दौंड-मनमाड रेल्वे मार्ग जवळ आहे. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग जवळ असून समृद्धी महामार्ग येथून आहे. उत्तर दक्षिण भारताला जोडणारा महामार्ग येथून जातो. शिवाय प्रस्तावित सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग येथून जाणार आहे. यामुळे हवाई, रेल्वे, भूमार्ग च्या दृष्टीने परिपूर्ण जिल्हा असेल. तरी नवीन तयार होणारे शहर हे उत्तर नगर जिल्ह्याचे केंद्र करून शिर्डी हा नवीन जिल्हा करून पर्यटन जिल्हा म्हणून त्याचा विकास करावा, अशी मागणी भाजपा सोशल मिडिया सेल उत्तर नगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असून मुख्यमंत्र्यांनी जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव नगर विकासाकडे असल्याचे सांगितले आहे.
वाघचौरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपण शिर्डी विमानतळाजवळ नवीन शहर वसविण्याचे घोषणा केली. याबाबत प्रथमतः आपले हार्दिक अभिनंदन..! अतिशय सुंदर व चांगला उपक्रम आपण घेतला आहे. ही नवीन कल्पना आपणास सुचली याबद्द्ल आपले मनपूर्वक धन्यवाद..! या शहरास नवी मुंबई, नवी दिल्लीच्या धर्तीवर नवी शिर्डी असे नाव द्यावे. अहमदनगर जिल्हा हा राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचा आहे. 17 हजार 413 चौरस किलो मीटर क्षेत्रफळ असणारा सह्याद्रीच्या डोंगरदर्‍यात वसलेला उत्तर महाराष्ट्रात असणारा कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भौगोलिक महसुली विभागाचे सरहद्दीवर व सात जिल्ह्यांच्या हद्द असलेला जिल्हा आहे. यामुळे महसूल, पोलिस अथवा इतर प्रशासनाला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. याजिल्ह्याच्या विभाजनाच्या दृष्टीने अनेक वेळा प्रयत्न झाला पण त्याला मुहूर्त काही मिळत नाही. आपण नवीन शहर वसविण्याचे घोषित केले त्याचा अतिशय चांगला उपयोग होईल. हे शहर निर्माण करताना जिल्हा मुख्यालय साठी आवश्यक असणार्‍या सुविधा निर्माण करता येतील आपण नवीन जे शहर वसविण्याचे ठरविले आहे ते कोपरगाव, राहता, संगमनेर तालुक्यांच्या सरहद्दीवर असेल. जिल्ह्यासाठी अग्रेसर असणारे श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव या तालुक्याचे पासून सारख्या अंतरावर म्हणजे 30 किलोमीटर वर तर नेवासा 65 किमी व अकोले 55 किमी व राहता 10 किमी अंतरावर हे नवीन शहर होईल. जिल्हाची हद्द 100 ते 110 किमी अंतराच्या आत राहणार आहे.
अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वांत मोठा जिल्हा समजला जातो. या जिल्ह्याचे विभाजन व्हावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. राज्यात महायुती सरकारच्या काळात भाजपचे मंत्री राम शिंदे यांनी जिल्हा विभाजनावर भाष्य केले होते. त्यानंतर हा प्रश्न अडगळीत पडला होता. भाजपने आता पुन्हा अहमदनगर जिल्हा विभाजनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

No comments:

Post a Comment