विकासकामांचा सपाटा लावल्याने आ. लंकेंचा पुढचा गुलाल लाखाचा ः चाकणकर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 15, 2021

विकासकामांचा सपाटा लावल्याने आ. लंकेंचा पुढचा गुलाल लाखाचा ः चाकणकर.

 विकासकामांचा सपाटा लावल्याने आ. लंकेंचा पुढचा गुलाल लाखाचा ः चाकणकर.

गाल आणि थोबाड रंगविल्याशिवाय गप्प बसणार नाही, घनघनाती टोला..


नगरी दवंडी/प्रतिनिधी
निघोज ः येथील विविध विकास कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.रुपालिताई चाकणकर यांच्या शुभहस्ते व पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे सन्मा.लोकनेते आमदार निलेश लंके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.राजश्रीताई घुले पाटील,मा.आमदार पोपट गावडे साहेब,पुणे जिल्हा परिषद सदस्य मा.पाडुरंग पवार साहेब,अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्षा सौ.मंजुषाताई गुंड यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
जे विदयार्थी एमपीएसी  व युपीएससी परिक्षेचा अभ्यास करत आहे.त्यांना अभ्यास करण्यासाठी व चांगले मार्गदर्शन करण्यासाठी  त्यांच्यासाठी 1 कोटी अभ्यासिकाचे भुमिपुजन निघोज येथे करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या सुधामती कवाद व युवा नेते रमेश वरखडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच सोमनाथ वरखडे, बाळासाहेब लंके, सुदाम पवार यांचा तालुका समितीवर निवड झाल्याबद्दल चाकणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  
पारनेर तालुक्यातील सामान्य जनतेच्या पाठिंब्यामुळे आमदार नीलेश लंके हे विधानसभेला पासष्ट हजार मतांनी निवडून आले. मात्र सध्या त्यांनी मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. आठवड्याला ते कोट्यवधी रुपयांची उद्घाटने करतात. त्यांनी विकासकामाचा सपाटा लावला असल्याने आमदार नीलेश लंके याचा पुढचा गुलाल लाखाचा असेल असे सांगून जनतेने त्यांना साथ द्या असे आवाहन रुपाली चाकणकर यांनी पारनेरच्या जनतेला केले आहे.
राज्यातील महिलांचा अपमान करणार असाल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. तुम्ही तमाम महिलांची जाहीर माफी मागा. अन्यथा आम्ही तुमचे गाल आणि थोबाड रंगविल्या शिवाय गप्प बसणार नाही. असा घनघनाती टोला भारतीय जनता पक्षाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना लगावला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक शांताराम कळसकर यांनी केले. यावेळी पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी,निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व यावेळी आमदार नीलेश लंके, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा मंजुषा गुंड, माजी आमदार पोपटराव गावडे, कन्हैया उद्योग समूहाचे अध्यक्ष शांताराम लंके, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, राजेश्री कोठावळे, दीपक सरडे, अशोक सावंत, प्रभाकर कवाद, ठकाराम लंके, सोमनाथ वरखडे, वसंत कवाद, बाळासाहेब लंके, सुदाम पवार आदीसह परिसरात सर्व विविध संस्थांचे मान्यवर व विभागातील सर्व सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्वच मान्यवरांचे सोमनाथ वरखडे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment