राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत नितीन चौधरीला रौप्यपदक. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 15, 2021

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत नितीन चौधरीला रौप्यपदक.

 राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत नितीन चौधरीला रौप्यपदक.

वडझिरे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे रहिवाशी असलेल्या नितीन सुदाम चौधरी याला राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदक मिळाले आहे. नितीन हा पारनेरच्या न्यू आर्ट्स कॉमर्स व सायन्स महाविद्यालयाचा विद्यार्थी असून अगोदर अनेक पदके त्यांनी मिळवली आहे. बुलढाणा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये त्यांनी हे यश मिळवले आहे. नितीन चौधरी याला या राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळाले आहे. व जिल्ह्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे.
या विद्यार्थ्याला पारनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर क्रीडा शिक्षक प्राध्यापक संजय गायकवाड पुणे येथील बॉक्सिंग प्रशिक्षक मनोज पिंगळे सर यांचे मार्गदर्शन लाभले. राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत त्याने यश मिळवल्याने वडझिरे ग्रामस्थांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. वडझिरे गावातील प्रगतशील शेतकरी  उद्योजक सुदाम किसन चौधरी यांचा तो मुलगा असुन एक ग्रामीण भाग विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवल्याने त्यांच्या कुटुंबियांचे मान उंचावली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. त्याच्या या यशाबद्दल प्राचार्य  रंगनाथ आहेर तसेच संदीप पाटील वराळ जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ, निघोज गावच्या सरपंच चित्रा सचिन  पाटील वराळ, निघोज गावचे उपसरपंच माऊली वरखडे, विद्यार्थी नेते निवृत्ती वरखडे, मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. दीपक आहेर भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख अशोक आंधळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
वडझिरे व पारनेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा..
नितीन सुदाम चौधरी या किकबॉक्सिंग  खेळाडूने राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्य पदक मिळवत आपल्या तालुक्याची व गावची मान उंचावत त्यांनी जे यश मिळवले आहे त्यामुळे  देवीभोयरे गावच्या व पारनेर तालुक्याच्या शेळके चा मध्ये मानाचा तुरा रोवला गेला आहे त्याच्या यशाची आता मित्र परिवाराकडून कौतुक होत आहे व त्याचे समाजात सत्कार व सन्मानही होत आहे.
नितीन चौधरी च्या यशाने आई वडिलांची उंचावली मान..
बॉक्सिंग पटू नितीन चौधरी याने राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्य पदक मिळवत आपल्या वडिलांची म्हणजे उद्योजक प्रगतिशील शेतकरी सुदाम चौधरी यांची पारनेर तालुक्यात व अहमदनगर जिल्ह्यात खर्‍या अर्थाने मान उंचावली आहे. त्यांनी केलेल्या या कार्यामुळे आज नितीन च्या आई-वडीलांनी समाधान व्यक्त केली आहे. आणि  नितीनचे ते मनापासून कौतुक करत आहेत समाजातील अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून नितीन चौधरी याचा मानसन्मान होत आहे त्यांनी केलेल्या या कार्यामुळे त्याच्या आई वडिलांची मान हि गौरवाने उंचावली आहे.

No comments:

Post a Comment