ब्लॅकमेलर नगरसेवकांना धडा शिकवणार- ओंकार घोलप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 15, 2021

ब्लॅकमेलर नगरसेवकांना धडा शिकवणार- ओंकार घोलप

 ब्लॅकमेलर नगरसेवकांना धडा शिकवणार- ओंकार घोलप

काही नगरसेवक ठेकेदारांस ब्लॅकमेलिंग करतात..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गेल्या एक ते दीड वर्षामध्ये नगर शहरात लाईटचा प्रश्न गंभीर बनला आहे त्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. याच अंधाराचा फायदा घेऊन चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. शहरांमध्ये महिला वर्गात सुरक्षितता राहिली नाही.काही नगरसेवक ठेकेदारांना खाजगी कार्यलयात बोलून पैसेची मागणी करतात या पुढील काळात शहर विकास कामात आडकाठी आणल्यास अशा नगरसेवकांना धडा शिकवणार असल्याचा इशारा पैलवान प्रतिष्ठानचे अध्यक्ष ओंकार घोलप यांनी दिला आहे.
मनपा आयुक्त शंकर गोरे यांना दिलेल्या निवेदनात घोलप यांनी म्हटले आहे की, अहमदनगर महापालिकेमार्फत स्मार्ट एलईडी प्रकल्पाला प्रशासकीय पातळीवर मान्यता देण्याची कार्यवाही प्रशासनामार्फत सुरू आहे पण काही विघ्नसंतोषी ब्लॅकमेलर लोक व नगरसेवक या कामासाठी खोडा घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण यापूर्वी या विघ्नसंतोषी लोकांकडून विकास कामाचा खोडा घालण्याची प्रथा आहे. स्मार्ट एलईडी बाबत जो काही तक्रारीचा प्रकार अहमदनगर महापालिकेत सुरू आहे तो विकासकामांना खोडा घालण्याचा चालू असल्याचा एकंदरीत आता समोर येत आहे, काही ब्लॅकमेलर नगरसेवक स्मार्ट एलईडी प्रकल्प पूर्ण होऊ नये म्हणून खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे अशा नगरसेवकांना पैलवान प्रतिष्ठान वटणीवर आणल्याशिवाय राहणार नाही नगर शहराचा विकास कामात जर कोणी आडकाठी घालत असेल तर या नगरसेवकांना व ब्लॅकमेल लोकांना पैलवान प्रतिष्ठान त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही असे ही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनाला उत्तर देतांना आयुक्त शंकर गोरे म्हणाले की, येत्या दिवाळीपर्यंत एलईडी प्रकल्प मार्गी लागणार आहे. अशा कुठल्याही प्रकारच्या मागणीला महापालिका प्रशासन पाठीशी घालणार नाही लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार असे ते म्हणाले. यावेळी गणेश गोरे, सागर आहेर, कृष्णा भागानगरे, अक्षय बोरुडे, रोहित सोनेकर, ऋषिकेश कुसकर, आदित्य फाटक, ओंकार मुदगंटी, शिवम घोलप, शाहिद सय्यद, अजय तडका, सुशांत राठोड, ओंकार बिडकर, शुभम कोमाकूल, ओम दोन्टा आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment