लाठीचार्ज करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा, विविध सामाजिक संघटनांची मागणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, September 11, 2021

लाठीचार्ज करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा, विविध सामाजिक संघटनांची मागणी.

 समाजावरील लाठीचार्जचा निषेध

लाठीचार्ज करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा, विविध सामाजिक संघटनांची मागणी.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नांदेड़ जिल्ह्यात कंधार मौजे गऊळ येथे सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा काढल्यावरून वैचारिक वादामध्ये समाजातील महिला पुरुषांवर पोलीस प्रशासनाकडून झालेल्या लाठीचार्जचा निषेध करत लाठीचार्ज करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांना निलंबित करण्याचे व अपशब्द वापरून शिवीगाळ करणार्‍या राजकिय गावगुंडांना कडक शासन करावे अशा मागणीचे निवेदन पारनेर पोलीस ठाणे येथे समाजाच्या सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आले.
    प्रसंगी क्रांतिगुरु लहुजी महासंघाचे राज्यसंपर्क प्रमुख सचिन नवगिरे, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट,महिला आघाडीच्या उषा ताई शिंदे,शशिकांत अण्णा कनिंगध्वज,विशाल साळवे,तेजस अवचार,दिपक खुडे,विकास साळवे,ऋषिकेश खुडे,संजय साठे,मानवहित लोकशाही पक्षाचे रामदास साळवे आदींसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
    यावेळी बोलताना सचिन नवगिरे म्हणाले की,महाराष्ट्र हे महापुरुषांचा वारसा असणारे राज्य आहे.शिवराय, फुले, शाहु,आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला लाजविणारी ही घटना असून शासनाने सदर प्रकरणात लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी. तर पुढे आपले विचार मांडताना सुनिल सकट म्हणाले की,सदर प्रकरणाची सखोल चौकशी होऊन आमच्या मागण्यांची दखल घेतली जावी असे न झाल्यास राज्यभरात तिव्र आंदोलन छेडण्यात येईल’. असा इशारा यावेळी देण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here