बलात्कारी नराधमांना मृत्युदंड, किंवा फाशी देण्याचा कायदा करा.विश्व मानवाधिकार परिषदेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 14, 2021

बलात्कारी नराधमांना मृत्युदंड, किंवा फाशी देण्याचा कायदा करा.विश्व मानवाधिकार परिषदेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन..

 बलात्कारी नराधमांना मृत्युदंड, किंवा फाशी देण्याचा कायदा करा.विश्व मानवाधिकार परिषदेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मुंबईतील साकीनाका परीसरात 30 वर्षीय महिला, दिल्लीतील पोलीस कर्मचारी महिला, पुणे येथील 14 वर्षीय मुलगी, पुण्यातील सहा वर्षीय चिमुकली, पिंपरी-चिंचवडमधील 38 वर्षीय महिला या सर्व बलात्काराच्या बळी आहेत. अत्याचार करणार्‍या नराधमांना मृत्युदंड अथवा फाशी देण्याचा कायदा अमलात आणला जावा अशी मागणी करणारे निवेदन विश्व मानवाधिकार परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना आज देण्यात आले.
महिलांवर गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रासह भारतासह महाराष्ट्रात अत्याचाराचे विविध प्रकारच्या घटना घडत आहेत. दिल्ली येथील पोलीस कर्मचारी राबीया उर्फ साबीया सैफि या महिलवर झालेला अमानुष अत्याचार तसेच पुणे येथील 14 वर्षीय मुलीचे अपहरण करुन सामुहिक बलात्कार करण्याची घटना घडुन 8 दिवसही झाले नाही तर पुणे येथे रात्रीच्या सुमारास आईळ झोपलेल्या अवघ्या 6 वर्षिय चिमुकलीचे अपहरण करुन अत्याचार केल्याची घटना पुणे स्टेशन येथे घडली. तसेच त्यापुर्वी पिंपरी चिंचवड येथील सांगवी परिसरात एका 38 वर्षीय महिला शिक्षीकेवर रिटायर एस.पी.असल्याचा बनाव करुन ब्लॅकमेल करत या शिक्षीकेवर अत्याचार करण्यात आले आहे. तसेच मुबई येथील साकीनाका परिसरात पुन्हा निर्भयासारखी घटना घडली आहे. एका 30 वर्षीय महिलेवर निर्घुणपणे अत्याचार करण्यात आला व ती माहिला त्यात मृत पावली आहे. याप्रकरणाचे अत्याचाराच्या अनेक घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशा प्रवृत्तीच्या गुन्हेगारांमध्ये कायद्याची भिती नसल्याने अशा विविध घटना समोर येत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष द्यावे आणि मृत्यू दंड सारखा कठोर कायदा अंमलात आणावा जेणेकरुन असेले अमानुष कृत्य कोणी करणार नाही असा कायदा आंमलात आणावा अशी मागणी विश्व मानवाधिकार परिषदेच्या वतीन निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष नवेद शेख, प्रदेश सचिव सय्यद शफी बाबा, महिला जिल्हाअध्यक्ष शबनम मोमीन, जिल्हा अध्यक्ष अज्जु शेख, अल्पसंख्यक जिल्हा अध्यक्ष अल्ताफ शेख, शहर अध्यक्ष चंद्रकांत उजागरे,उपाध्यक्ष शाहनवाज शेख, मुख्य सचिव शादाब कुरेशी,मुफ़्ती अलताफ मोमीन, शरीफ सय्यद, रोहिणी पवार, सुरेखा जैन, तहेसिन शेख आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment