रेल्वे माथाडी कामगार, मालवाहतूकदारांचा संप मिटला. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 14, 2021

रेल्वे माथाडी कामगार, मालवाहतूकदारांचा संप मिटला.

 रेल्वे माथाडी कामगार, मालवाहतूकदारांचा संप मिटला.

आ.संग्राम जगताप, अविनाश घुलेच्या मध्यस्थीने..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर रेल्वेस्थानकावरील मालधक्का जिल्ह्यातील व्यवसायिकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा विषय. 42 दिवस माथाडी कामगार व माल वाहतूकदारांचा संप सुरू असल्याने हा धक्का स्थलांतरित होण्याचा धोका होता. मालधक्का स्थलांतरित करण्याचा प्रयत्न काही दिवसांपासून चालू होता परंतु हा मालधक्का स्थलांतरित केल्यामुळे अनेक माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ येणार होती.सदरच्या प्रकरणांमध्ये आ.संग्राम जगताप यांनी व अविनाश घुले यांनी लक्ष घालून माथाडी कामगारांना समवेत संवाद साधून कामगार आयुक्त व माल वाहतुकदार यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न हा मार्गी लावला आहे.  मार्केट यार्ड येथील कामगार आयुक्त कार्यालय येथे आ.संग्राम जगताप यांनी माथाडी कामगार व मालक वाहतूकदार यांच्यासमवेत बैठक घेतली व या बैठकीत या प्रश्नांवर तोडगा निघाला.
यावेळी बोलताना आ.संग्राम जगताप म्हणाले की, रेल्वे स्टेशन वरील मालधक्का हा संपूर्ण जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा महत्वाचा प्रश्न आहे या माध्यमातून खताचा,अन्नधान्याचा तसेच सिमेंट सह इतर वस्तूंचा पुरवठा संपूर्ण जिल्ह्याला केला जातो, गेली 42  दिवस हा संप सुरू असल्यामुळे विविध समस्यांना कामगारांसह नागरिकांना देखील सामोरे जावे लागत होते हा संप मिटणे गरजेचा होता. हा प्रश्नन समजल्यानंतर ताबडतोब हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले व सर्व माथाडी कामगारांना व मालवाहतूकदारांना एकत्रित करून हा प्रश्न मार्गी लावला असे ते म्हणाले. यावेळी बोलताना हमाल माथाडी कामगार संघटनेचे नेते अविनाश घुले म्हणाले की, माथाडी कामगार व मालवाहतूकदार यांचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे परंतु चालू असलेल्या संपाचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचा होता. आ.संग्राम जगताप यांनी सकारात्मक निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावला त्यामुळे माथाडी कामगारांवर येणारी उपासमार टळली तसेच स्थलांतरित होणार माल धक्का आमदार संग्राम जगताप यांच्या मध्यस्थीमुळे रद्द झाला. या संपामध्ये सर्वांचेच नुकसान झाले होते अनेक वर्षापासून आपण सर्वजण एकत्रित राहून काम आहे.यापुढे आपण करू व काही प्रश्न चर्चने मार्गी लावू असे ते म्हणाले. मालवाहतूक संघटनेचे नानासाहेब गाडे म्हणाले की,अनेक वर्षांपासून माथाडी कामगार व आम्ही समन्वयाने काम करत आहोत यापुढेही असेच एकत्रित राहून काम करू, एकमेकांच्या समज-गैरसमजुतीतून ही घटना घडली आहे परंतु आ.संग्राम जगताप यांनी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावला असे ते म्हणाले.
यावेळी हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले,कामगार आयुक्त जासमीन शेख,समवेत नगरसेवक प्रशांत गायकवाड,विलास उबाळे,गोविंद सांगळे,मालवाहतूकदार नानासाहेब गाडे,करीम हुंडेकरी,भरत ठाणगे, गुरुविदरसिंग वाही,उद्धव पवार,आदींसह माथाडी कामगार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment