दिवसा घराचे कुलूप तोडून चोर्‍या करणारा गजाआड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 2, 2021

दिवसा घराचे कुलूप तोडून चोर्‍या करणारा गजाआड

 दिवसा घराचे कुलूप तोडून चोर्‍या करणारा गजाआड

पाथर्डी - शिक्षणाचे धडे घेऊन भावी आयुष्य सुख समाधानात व्यतीत करण्याचे स्वप्न रंगविण्याऐवजी युवा पिढी गुन्हेगारीकडे वळत असल्याचे धक्कादायक वास्तव  समोर येऊ लागलं आहे. दिवसा घराचे कुलूप तोडून चोर्‍या करणार्‍या चैतन्य बलभीम कांबळे रा. कासार पिंपळगाव ता. पाथर्डी या एकोणीस वर्षाच्या युवकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले असून मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार पथकातील सपोनि गणेश इंगळे, सपोनि सोमनाथ दिवटे, सफा मनोहर शेजवळ, पोना  सुरेश माळी, विशाल दळवी, शंकर चौधरी, दिपक शिंदे, पोकॉ रोहीदास नवगिरे, चालक पोहेकॉ संभाजी कोतकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे. याबाबत समजलेले माहिती अशी की  घर बंद करुन बाहेर गेले असताना सकाळी 11.30 वा. ते सायंकाळी 6.30 वा. चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिणे, रोख रक्कम, मोबाईल व गव्हाच्या दोन गोण्या असा एकूण 51 हजार  रु. किं. चा मुद्देमाल घरफोडी चोरी करुन चोरुन नेला होता. याप्रकरणी रघूनाथ जबाजी जाधव (वय 58, रा. जवखेडे खालसा, ता. पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरून  पाथर्डी पोलीस ठाण्यात  गुरनं. 573/ 2021 भादवि कलम 454, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.या दाखल गुन्ह्याचा तपास सुरु असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके  यांना खबर्‍याकडून माहिती मिळाली.  गुन्हा हा राहूल पगारे ( रा. कासार पिंपळगाव, ता. पाथर्डी) याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. श्री कटके यांनी पथकाला सूचना दिल्या. पथकाने पाथर्डी येथे जावून आरोपी राहूल पगारे याचा कासार पिंपळगाव परिसरामध्ये शोध घेतला. परंतू तो मिळून आला नाही. सदर आरोपीचे साथीदाराबाबत बातमीदारांकडून माहिती घेऊन मिळालेल्या माहितीचे आधारे साथीदार आरोपींचा शोध घेऊन प्रथम आरोपी चैतन्य बलभिम कांबळे ( वय 19 वर्षे, रा. कासार पिंपळगाव, ता. पाथर्डी) यांस ताब्यात घेतले. त्यास विश्वसात घेऊन त्याचेकडे पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा हा साथीदार राहूल पगारे व आणखी दोन साथीदारांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. त्यावरुन आरोपींचा शोध घेऊन एक अल्पवयीन मुलगा (रा. कासार पिंपळगाव, ता. पाथर्डी) यास ताब्यात घेतले. त्यांचे चौथ्या साथीदाराचा शोध घेतला. परंतु तो मिळून आला नाही.
ताब्यात घेतलेला आरोपी व अल्पवयीन मुलगा यांचेकडे गुन्ह्यातील चोरलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केलं. असता त्यांनी सोन्याचे दागिणे साथीदार राहूल पगारे याचेकडे असल्याचे सांगून गुन्ह्यातील चोरलेला 4 हजार रु. किं. चा ओपो कंपणीचा मोबाईल व 2 हजार रु. किं. च्या दोन गव्हाच्या गोण्या असा एकूण 6 हजार  रु. किं. चा मुद्देमाल काढून दिल्याने तो जप्त करुन आरोपी व त्याचा अल्पवयीन साथीदार यांना मुद्देमालासह पाथर्डी पोलीसांच्या ताब्यात दिले. पुढील तपास  पाथर्डी पोलीस करीत आहेत.

No comments:

Post a Comment