अहमदनगर कुस्तीलीग, राज्यातील कुस्तीगिरांसाठी संजीवनी ठरेल ः काका पवार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 8, 2021

अहमदनगर कुस्तीलीग, राज्यातील कुस्तीगिरांसाठी संजीवनी ठरेल ः काका पवार

 अहमदनगर कुस्तीलीग, राज्यातील कुस्तीगिरांसाठी संजीवनी ठरेल ः काका पवार

पारनेर येथे कुस्ती लीग स्पर्धेचे अनावरण संपन्न...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः  कोरोना वैश्विक महामारीमुळे कुस्ती क्षेत्राची जबरदस्त पीछेहाट झाली आहे.कुस्ती मैदाने,स्पर्धा व तालमी सुद्धा गेली दीड वर्षे बंद असल्याने महाराष्ट्राची कुस्ती मागे जात आहे. कोरोना मुळे पैलवान व कुस्तीचे अतोनात नुकसान झाले.लोकवर्गणी मधून होणारी मैदाने यापुढे लवकर होणे अशक्य आहे त्यामुळे अश्या व्यावसायिक लिगमुळे कुस्ती क्षेत्रात पुन्हा ऊर्जा येईल  अहमदनगर कुस्ती लीग महाराष्ट्रच्या कुस्तीगिरांसाठी संजीवनी ठरेल.असे प्रतिपादन अर्जुनवीर काकासाहेब पवार यांनी केले.

अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या क्रांतिकारी विचारातून अहमदनगर जिल्हा कुस्ती लीग ही संकल्पना महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात पुढे येत आहे.या स्पर्धेचे अनावरण काल दिनांक 7 सप्टेंबर 2021 रोजी श्रीशिवछत्रपती कुस्ती संकुल पारनेर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. अहमदनगर जिल्हा तालीम संघ व ओम साई एंटरप्राइजेस यांनी अहमदनगर कुस्ती लीगचे आयोजन केले आहे.
याप्रसंगी पवार बोलत होते.स्पर्धेचे स्वरुप कसे असेल याबद्दल आयोजकांनी माहिती दिली आहे की या कुस्ती लीग मध्ये एकूण 6 संघ असणार असून प्रत्येक संघात 5 मुले व 1 महिला मल्ल यासह 1 परराज्यातील खेळाडू असेल.पुरुष मल्ल 58,65,74,84,120 या वजन गटातील असतील तर महिला मल्ल 51 वजनगटातील असतील.डिसेंबर 2021 मध्ये  या स्पर्धा होणार आहेत.
प्रत्येक संघाची किंमत 10 लाख असेल व यातील 7 लाख खेळाडूंसाठी राखीव राहणार आहेत.आत्तापर्यंत 3 संघ विकले गेले आहेत.श्रीगोंदा पारनेर पॉवर - पै.युवराज पठारे, कर्जत जामखेड मावळे - विजूकाका तोरडमल, संगमनेर अकोले योध्ये - बबलूशेठ धुमाळ यावेळी अर्जुनवीर काकासाहेब पवार, अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, नाशिक जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष गोरखनाथ बलकवडे,महाराष्ट्र केसरी अशोक शिर्के, महान भारत केसरी पै.विजय गावडे, मुंबई महापौर केसरी पै.किशोर नखाते यासह, पै.दत्तात्रय अडसुरे,श्री शिवछत्रपती कुस्ती संकुलाचे सर्वेसर्वा पै.युवराज पठारे, पै.धनंजय जाधव, पै.महेश जाधव, पै.विजुकाका तोरडमल, पै. नानासाहेब डोंगरे, पै.विलास चव्हाण, पै.विक्रम बारवकर, पै.बबलू धुमाळ, पै.जे.डी.शेख, पै.संदीप बारगुजे, पै.दीपक दावखर, पै.भागवत ठोंबरे,पै.मोहन हिरणावळे, पै.प्रताप चिंचे, पै.प्रवीण भाऊ घुले, पै.रवींद्र वाघ, पै.मिलिंद जपे, पै.बंडू भाऊ शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment