नेवासा पोलिस सक्षमपणे कर्तव्य बजावणार ः पोवार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, September 15, 2021

नेवासा पोलिस सक्षमपणे कर्तव्य बजावणार ः पोवार.

 नेवासा पोलिस सक्षमपणे कर्तव्य बजावणार ः पोवार.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः कायदा व सुव्यवस्था अबधित राखण्यासाठी नेवासा पोलिस ठाण्याच्या सर्वच पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना विश्वासात घेवून आपण खंबीरपणे कामकाज करु असा विश्वास नेवासा पोलिस ठाण्याचे नव्यानेच सुञहाती घेतलेले पो.नि.बाजीराव पोवार यांनी पञकारांशी संवाद साधतांना स्पष्ट केले.
सोमवारी (दि.13) रोजी सांयकाळी पाच वाजता नेवासा पोलिस ठाण्यात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतांना ते म्हणाले की,नेवासा पोलिस ठाण्याचे वातावरण सर्वांनाच ज्ञात आहे आपण यापुढे सर्व पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना विश्वासात घेवून कामकाज करु या पोलिस ठाण्यात महसूलशी निगडीत अनेक तक्रारी पोलिस ठाण्यात येत असल्याचे मला समजलेले आहे आणि हे काम पोलिसां-कडून होण्याची अपेक्षा जनतेची असते.पोलिसांना कायदा व सुव्यवस्था अबधित ठेवून गुन्हेगारी संपुष्ठात आणण्या-साठी पोलिस प्रशासन प्रयत्न करणार आहे.महसूलशी निगडीत काम हे तहसिल कार्यालयाचे असून जनतेने जे,ते काम,ज्या - त्या विभागात करुन घ्यावे पोलिसांच्या अखत्यारित असणारे काम पोलिस सक्षमपणे पार पाडतील असा विश्वासही पोवार यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पुण्यभूमीत मला काम करण्याची संधी मिळाली ही कौतुकास्पद बाब असून जनतेने आपल्या तक्रारी पोलिस ठाण्यात बेडरपणे मांडाव्यात सत्यता पडताळून पोलिस न्याय देण्याचे काम करतील असेही यावेळी पोलिस निरीक्षक पोवार यांनी सांगितले.
यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here