स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाची सुरुवात करावी- नगरसेवक डॉ. बोरुडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, September 6, 2021

स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाची सुरुवात करावी- नगरसेवक डॉ. बोरुडे

 स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाची सुरुवात करावी- नगरसेवक डॉ. बोरुडे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्थायी समितीच्या वतीने शहरात स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याच्या निविदेला मंजुरी दिली असून महापालिका प्रशासनाने ठेकेदाराला कार्यारंभ आदेश लवकरात-लवकर दयावा व प्रभाग क्र.1 व 7 मधून स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाचा सुरवात करावी अशी मागणी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांच्याकडे निवेदनाद्वारे करताना स्थायी समितीचे सदस्य डॉ.सागर बोरुडे यांनी मागणी केली.
डॉ. सागर बोरुडे निवेदनाद्वारे पुढे म्हणाले की,प्रभाग 1 व 7 हे सावेडी उपनगरातील विस्ताराने मोठे असलेले प्रभाग आहे. गेल्या अनेक दिवसापासून पथदिवे बंद आहे त्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले,याचाच फायदा घेत या प्रभागांमध्ये घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे तसेच महिलाच्या गळ्यातील मंगळसूत्र  हिसकावण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.प्रभाग क्रमांक एक व सात हा एमआयडीसी जवळचा भाग असून, या परिसरातील नागरिकांना एमआयडीसी मध्ये नोकरीसाठी जावे लागते रात्री-अपरात्री कामावरून घरी येतानां अंधारामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागते व त्यामुळे या भागात भुरट्या चोर्या व लुटमारीचे प्रमाण वाढले आहे यासाठी प्रभाग क्रमांक एक व सात मधून नवीन स्मार्ट एलईडी पथदिवे बसवण्याचे काम या प्रभागातून सुरू करण्याची मागणी स्थायी समितीचे सदस्य डॉ.सागर बोरुडे यांनी निवेदनाद्वारे केली.

No comments:

Post a Comment