सामाजिक संवेदना जागृक ठेऊन शिक्षकांनी पूरग्रस्तांसाठी केलेली मदत दिशादर्शक - प्रताप पाटील शेळके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 7, 2021

सामाजिक संवेदना जागृक ठेऊन शिक्षकांनी पूरग्रस्तांसाठी केलेली मदत दिशादर्शक - प्रताप पाटील शेळके

 सामाजिक संवेदना जागृक ठेऊन शिक्षकांनी पूरग्रस्तांसाठी केलेली मदत दिशादर्शक - प्रताप पाटील शेळके

जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषद, गुरुमाऊली मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षकांची मदत पूरग्रस्तांसाठी रवाना


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुराचा फटका बसला असताना त्यांना सावरण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी मदतीचा हात दिला आहे. जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषद, गुरुमाऊली मंडळाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी रावसाहेब रोहोकले यांच्या नेतृत्वाखाली साडेतीन लाख रुपये रोख निधी संकलन करुन जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरुपात मदत जमा करण्यात आली. कपडे, भांडी, शैक्षणिक साहित्य आदिंचा समावेश असलेल्या जीवनावश्यक वस्तूंची मदत घेऊन ट्रक जिल्हा परिषद येथून रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात आला.
मदत घेऊन जाणार्या ट्रकपुढे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांच्या हस्ते श्री फळ वाढविण्यात आला. यावेळी राजेश परजणे, अर्थ विभागाचे सभापती काशिनाथ दाते, बांधकाम विभागाचे सभापती सुनिल खडाख, समाजकल्याण सभापती उमेश परहार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, प्राथमिक शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गुंड, राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब रोहोकले, उपाध्यक्ष संजय शेळके, परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे, विकास मंडाळाचे नेते संजय शिंदे, गुरूमाऊलीचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे, परिषदेचे नेते संतोष खामकर, प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, सुनिल पवळे, बाबा पवार, दशरथ ढोले, विकास मंडळ अध्यक्ष भाऊसाहेब ढोकरे, विकास मंडळ विश्वस्त सुनंदा आडसुळ, बँकेचे संचालक राजेंद्र मुंगसे, बाबा धरम, संजय आंबरे, संतोष भोर, दत्तात्रय गवळी, प्रभाकर झेंडे, राजेंद्र भोसले, बाळासाहेब वाबळे, गणेश वाघ, संजय दळवी, सरस्वती गुंड, संदिप सुंबे, सहकार्यवाह रविंद्र कांबळे, विश्वस्त अविनाश साठे, सुजित बनकर आदिंसह शिक्षक उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके म्हणाले की, सामाजिक संवेदना जागृक ठेऊन शिक्षकांनी पूरग्रस्तांसाठी केलेली मदत दिशादर्शक आहे. संकटकाळात मदतीसाठी धावून आलेल्या शिक्षकांची भावना प्रेरणादायी आहे. कोरोनाचे संकट असो किंवा महापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषद, गुरुमाऊली मंडळाच्या माध्यमातून शिक्षकांनी नेहमीच मदतीचा हात दिला आहे. अशा संकटकाळात सर्व बांधवांनी खारीचा वाटा उचलून संकटात सापडलेल्या आपल्या बांधवांना मदत करण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देखील पूरग्रस्तांसाठी भरीव मदत दिली जाणार असून, काही गाव दत्तक घेण्याचा मानस असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. रावसाहेब रोहोकले यांनी पूराच्या प्रलयाने कोकण भागातील नागरिकांचे कुटुंब उध्वस्त झाली आहे. पूरग्रस्त बांधवांना मदत देण्याची गरज आहे. संकटात अडकलेल्या आपल्या बांधवांचे नुकसान भरुन निघणार नाही. पण त्यांना धीर देण्यासाठी शिक्षकांनी मदतीचा हात पुढे केला असल्याचे सांगितले. जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषद, गुरुमाऊली मंडळाच्या वतीने आवाहन करुन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तब्बल साडे तीन लाखाचा सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन मदत निधी जमा करण्यात आला. रोख रकमेतून पूरग्रस्त बांधवांसाठी गृहपयोगी भांडी, कपडे व शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यात आले. पूराचा सर्वाधिक फटका बसलेल्या पाच गावांना समक्ष भेट देऊन सर्व पदाधिकारी मदतीचे वाटप करणार आहेत. या वास्तूमध्ये प्रामुख्याने कुटुंबासाठी चादरी, ब्लँकेट, चटई, महिलांसाठी भांडे व स्त्री-पुरुषांसाठी वस्त्रे, टावेल तसेच विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग, वह्या, कंपास बॉक्स, पेन, पेन्सिल, बिस्किटे आदी महत्त्वाच्या जीवनावश्यक बाबींचा समावेश असल्याचे विकास डावखरे यांनी स्पष्ट केले. आभार संजय शेळके यांनी मानले.

No comments:

Post a Comment