शहर जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळकांना अभिवादन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, August 2, 2021

शहर जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळकांना अभिवादन

 शहर जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळकांना अभिवादन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तर लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. सिध्दार्थनगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास तर टिळक रोड येथील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
 या अभिवादन कार्यक्रमप्रसंगी नगरसेवक कुमारसिंह वाकळे, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, परिमल निकम, अजय दिघे, किसनबेद मुथा, संभाजी पवार, योगेश नेमाणे, मनिष साठे, अमोल कांडेकर, अंकुश मोहिते, गणेश बोरुडे, लहू कराळे, संजय दिवटे, साहेबराव काते आदी उपस्थित होते.
प्रा.माणिक विधाते म्हणाले की, दोन्ही महापुरुषांचे कार्य महान असून, एका पर्वाचा अस्त तर दुसर्‍या पर्वाचा उदय हा या भारताच्या जडघडणी मधील मोठा योगायोग आहे. स्वातंत्र्य चळवळीत लोकमान्य टिळकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. समाज जागृतीची ज्योत अण्णाभाऊंनी पेटवली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊंचे नांव अग्रक्रमाणे घेतले जाते. देशाचे स्वातंत्र्य व महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्याचे काम सर्व नागरिकांना करण्यासाठी या महापुरुषांचा विचार व कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here