पोलिसांच्या ताब्यातील ‘पोक्सो’ गुन्ह्यातील, आरोपी सादिकचा उपचारादरम्यान मृत्यू. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 21, 2021

पोलिसांच्या ताब्यातील ‘पोक्सो’ गुन्ह्यातील, आरोपी सादिकचा उपचारादरम्यान मृत्यू.

 पोलिसांच्या ताब्यातील ‘पोक्सो’ गुन्ह्यातील, आरोपी सादिकचा उपचारादरम्यान मृत्यू.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः ‘पोस्को’ गुन्ह्यातील आरोपी सादिक लाडलेसाहेब बिराजदार (वय 32 रा मुकुंदनगर) याचा काल रात्री 8 च्या सुमारास खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.भिंगार पोलीस पोलीस ठाण्यात या आरोपीस नेत असताना 15 ऑगस्टला त्यास अमानुषपणे मारहाण झाली. त्यामुळे तो जखमी झाला होता. त्याच्या पत्नीच्या फिर्यादीवरून पाच जणांच्या विरोधात कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपचारादरम्यान त्याचा काल मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत आता आणखी वाढणार आहे.
बिराजदार याच्याविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 28 जून 2021 रोजी गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. आरोपी त्याच्या घरी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. भिंगार ठाण्यातील दोन पोलिसांनी 15 ऑगस्टच्या सायंकाळी साडेसात वाजता सादिक याला त्याच्या मुकुंदनगर येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले. पोलीस सादिक याला शासकीय वाहनातून पोलीस स्टेशनला घेऊन जात होते.
आरोपी सादिकला भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनचे कर्मचारी शेख आणि पालवे ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला घेऊन जात असताना भिंगार नाला परिसरात सादिकला पाच जणांनी मारहाण केली असल्याची फिर्याद सादिकची पत्नी रुक्सार बिराजदारने पोलीस स्टेशनला दिलेली आहे. रूक्सार बिराजदारच्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात 307 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सादिकचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच अपर पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, श्रीरामपूरचे उपाधीक्षक संदीप मिटके, नगर शहर विभागाचे उपाधिक्षक विशाल ढुमे, कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख आदी सादिकवर उपचार चालू असलेल्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.
न्यायालयाच्या पंचनाम्या-नंतर पुणे येथे ससून रुग्णालयात त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

No comments:

Post a Comment