रोटरी सेंट्रलचे प्रसन्ना खासगीवाले यांना झोनल बेस्ट प्रेसिडेंट तर ईश्वर बोरा यांना डिस्ट्रिक्ट बेस्ट सेक्रेटरी पुरस्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, August 21, 2021

रोटरी सेंट्रलचे प्रसन्ना खासगीवाले यांना झोनल बेस्ट प्रेसिडेंट तर ईश्वर बोरा यांना डिस्ट्रिक्ट बेस्ट सेक्रेटरी पुरस्कार

 रोटरी सेंट्रलचे प्रसन्ना खासगीवाले यांना झोनल बेस्ट प्रेसिडेंट तर ईश्वर बोरा यांना डिस्ट्रिक्ट बेस्ट सेक्रेटरी पुरस्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लबच्या वार्षिक वार्षिक डिस्ट्रिक्ट पुरस्कार संमारंभात मागील वर्षीच्या उत्कृष्ट कामगिरीसाठीच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात रोटरी क्लब  ऑफ अहमदनगर सेंट्रलने एकूण 18 बक्षिसांवर मोहोर उमटवत जिल्ह्यातील उत्कृष्ट क्लबचा बहुमान मिळवला आहे. झोन सी मध्ये रोटरी सेंट्रलचे माजी अध्यक्ष प्रसन्ना खाजगीवाले यांना बेस्ट प्रेसिडेंट तर ईश्वर बोरा यांना डिस्ट्रिक्ट बेस्ट क्लब सेके्रटरीचा पुरस्कार मिळाला आहे. माजी प्रांतपाल हरिष मोटवानी, इंदौरचे माजी प्रांतपाल गजेंद्र नारंग ह्यांच्या हस्ते तर माजी प्रांतपाल शिरीष रायते, प्रमोद पारीख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा झाला.
वर्षभरात रोटरी सेंट्रलने भरीव समाजकार्य करीत रोटरीच्या डिस्ट्रिक्ट 3132 मध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. पर्यावरण, शिक्षण या क्षेत्रात योगदान देतानाच करोना महामारीच्या काळात आरोग्यसेवेच्या सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. अमरधाम येथे करोना मयतांवर अंत्यसंस्कार करणार्या करोना योध्दयांना पीपीई सुरक्षा किट वितरण, आयटीआयच्या तंत्रज्ञांना हॉस्पिटलमधील ऑक्सिजन यंत्रणा तपासणीसाठी सुरक्षा किटचे वितरण रोटरी सेंट्रलने केले. याशिवाय करोना काळात आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेवून महानगरपालिकेच्या सहकार्यातून सुसज्ज असे रोटरी कोविड केअर सेंटर उभारण्यातही रोटरीने योगदान दिले. याठिकाणी हजारो रूग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात रोटरियन मनिष बोरा यांना बेस्ट असिस्टंट गव्हर्नर म्हणून पुरस्कार देण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here