प्रश्न मार्गी लावण्याचे शिक्षणाधिकारी हराळ यांचे आश्वासन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 6, 2021

प्रश्न मार्गी लावण्याचे शिक्षणाधिकारी हराळ यांचे आश्वासन

 प्रश्न मार्गी लावण्याचे शिक्षणाधिकारी हराळ यांचे आश्वासन

माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघाच्या बैठकित विविध प्रश्नांवर चर्चा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघाची बैठक माध्यमिक शिक्षक भवन मध्ये पार पडली. यामध्ये शिक्षकेतर कर्मचार्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तसेच विविध प्रश्नांचे निवेदन जिल्हा परिषदचे माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांची भेट घेऊन देण्यात आले. यावेळी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष भिमाशंकर तोरमल, सचिव भानुदास दळवी, विभागीय सचिव गोवर्धन पांडुळे, सहसचिव नाना डोंगरे, उपाध्यक्ष पद्माकर गोसावी, खजिनदार विजय हराळे, महेंद्र बोरुडे, आमोद नलगे, सविता शिंदे, संदिप पानमळकर, भाऊसाहेब काकडे आदी उपस्थित होते.
शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अडीअडचणी व प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी हराळ यांनी दिले. तसेच सदर प्रश्न मार्गी लावण्याचे संबंधित विभागाला सूचना केल्या. इयत्ता दहावी व बारावीचे ऑनलाइन निकाल लागलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी दाखले अपलोड करावे लागतात. विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये म्हणून शाळा सोडल्याचे दाखले वितरित करावे, जर दाखले तयार नसेल तर विद्यार्थ्यांना शालेय बोनाफाईड देण्यात यावे. त्यामध्ये जन्मतारीख, जात, जन्म स्थळ, बरोबरच राष्ट्रीयत्वाचा उल्लेख करण्यात यावा अशी सूचना संघटनेच्या शिष्टमंडळाने मांडली. मे, जून, जुलै या महिन्यात सेवानिवृत्त कर्मचारी यांचे निवृत्तीच्या अगोदरच 15 दिवस पेन्शन मंजूर झाल्याबद्दल संघटनेने शिक्षणाधिकारी हराळ  यांचे अभिनंदन केले. कोरोना नियमाचे पालन करुन संघटनेच्या मोजक्या पदाधिकार्यांच्या उपस्थितीमध्ये सदर बैठक घेण्यात आली.

No comments:

Post a Comment