शहरांमधील पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत खाजगी वाहतूक बाह्यवळण रस्त्याने करण्याची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 21, 2021

शहरांमधील पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत खाजगी वाहतूक बाह्यवळण रस्त्याने करण्याची मागणी

 शहरांमधील पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत खाजगी वाहतूक बाह्यवळण रस्त्याने करण्याची मागणी

अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर शहरांमध्ये पुलाचे काम चालू असून शहरामध्ये बाहेरगावावरून येणार्या खाजगी प्रवासी वाहतूक बसेस आधी गाड्यांना पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत बाह्यवळण रस्त्याने जाण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन करण्यात आली यावेळी महिला जिल्हा अध्यक्ष सुरेखाताई सांगळे समवेत भिंगार शहराध्यक्ष गणेश शिंदे, तालुका उपाध्यक्ष गोरख आढाव, सचिव गणेश गायकवाड, काका पाटील गायके, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे बाळासाहेब ढवळे, मीनाक्षी जाधव, महेमूद पठाण, किशोर शिकारे, भारत फुलमाळी, बाळासाहेब तोडमल आदी उपस्थित होते.
अहमदनगर शहरांमध्ये सक्कर चौक ते पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी पर्यंत  पुलाचे काम चालू आहे त्या कामामुळे विविध ठिकाणी खोदकाम करण्यात आलेले आहेत या कामाच्या अनुषंगाने शहर वाहतूक विभागाने काही ठिकाणी वाहतूक देखील वळविलेली आहेत व मार्ग बंद करण्यात आलेले आहेत तसेच  बाहेरगावावरून येणार्या प्रवासी वाहतूक हे राजरोसपणे वाहतुकीचे सर्व नियम मोडून शहरांमध्ये पुण्याच्या काम चालू असताना त्या रस्त्यावरून जातात व तेथे सध्या ट्राफिक जाम होत आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये वाहकास रस्त्यावरील खड्डे पुलाच्या कामासाठी लावलेल्या बॅरिकेट याचा अंदाज न आल्यास मोठा अपघात होऊ शकतो व यामध्ये प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो यापूर्वीदेखील छोटे-मोठे अपघात या ठिकाणी झालेले आहेत या सर्व घटना होऊ नये या अनुषंगाने शहरांमध्ये बाहेरगावावरून येणार्या प्रवासी वाहतुकीस पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत बाह्यवळण रस्त्यावरून जाण्याचे आदेश द्यावेत व शहरामध्ये ट्राफिक जाम देखील होणार नाही अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment