वाडियापार्क बॅडमिंटन कोर्ट संपूर्ण क्षमतेने सुरु व्हावेत ः खेळाडूंची मागणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, August 16, 2021

वाडियापार्क बॅडमिंटन कोर्ट संपूर्ण क्षमतेने सुरु व्हावेत ः खेळाडूंची मागणी.

 वाडियापार्क बॅडमिंटन कोर्ट संपूर्ण क्षमतेने सुरु व्हावेत ः खेळाडूंची मागणी.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगरमधील एकमेव असे शासकीय बॅडमिंटन कोर्ट असून करोना निर्बंधांमुळे जवळपास गेल्या दीड वर्षांपासून बंद अवस्थेत आहे येथे तीन प्रशिक्षण वर्ग देखील बॅडमिंटन घेतले जातात शासनाच्या नियमानुसार बॅडमिंटनच्या एका कोर्टवर फक्त दोन खेळाडूंना परवानगीहा नियम ठेवण्यात आला आहे. हा नियम प्रशासनाने बदलावा व पूर्ण क्षमतेने हे कोर्ट सुरु करावेत अशी मागणी बॅडमिंटन खेळाडूंनी केली आहे.
नगरमधील खाजगी कोर्ट्स पूर्ण क्षमतेने सुरु आहेत ते सुरु राहावेत परंतु त्यांना एक नियम व फक्त शासकीय कोर्ट ला दुसरा नियम हे कितपत योग्य आहे. नगरमधील हॉटेल पूर्ण क्षमतेने, मॉल, विवाह कार्यक्रम, शासकीय कार्यालय सुरु आहेत. हॉटेलमध्ये तर एका टेबलवर आठ जण बसलेले पाहावयास मिळतात मग बॅडमिंटनला हे नियम लागू होतात का याचा प्रशासनाने विचार करावा. वा कारण दिवसभरात सुमारे दीडशे खेळाडू या कोर्ट वर या खेळाचा सराव करतात एक सर्वांगसुंदर व्यायाम असे या खेळाकडे पहिले जाते रोग प्रतिकार शक्ती देखील या खेळामुळे वाढतेअसे असताना नवीन खेळाडू तयार व्हावेत यासाठी सुरु असलेले प्रशिक्षण वर्ग देखील पूर्ण बंद आहेत मग भविष्यात खेळाडू कसे तयार होणार तरी या सर्व बाबींचा प्रशासनाने विचार करून पूर्ण क्षमतेने बॅडमिंटन कोर्ट सुरु करावेत अशी कळकळीची मागणी खेळाडू करत आहेत यासाठी काही खेळाडूंनी क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधला असता कमिटी स्थापन करावी लागेल जिल्हधिकारी यांच्याशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ थोडे थांबा अशी उत्तरे मिळतात.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here