प्रामाणिकपणा हा यशाचा पाया : उपजिल्हाधिकारी पल्लवी झरेकर
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः करोनाच्या दुसर्या लाटेत सर्वत्र सुविधा पुरवताना शासकीय अधिकारी व कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून मदत करत होते. या क्रिटीकल परस्थितीत सर्वत्र ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची जवाबदारी मी पार पाडली. आपत्कालीन परिस्थितीत नेमून दिलेले काम प्रामाणिकपणे करत सर्वांना भरपूर मदत केली. केलेल्या कामाची दखल स्वतः जिल्हाधिकारींनी घेवून माझी पुरस्कारासाठी निवड केली. पुनर्वसन विभागाचा प्रथमच ‘सर्वोकृष्ट उपजिल्हाधिकारी’ म्हणून हा सन्मान झाला आहे. विद्यर्थ्यांनी आयुष्यत जे काम निवडले आहे ते प्रामाणिकपणे करावे, प्रामाणिकपणा हा यशाचा पाया आहे. ओम साई कॉलनीच्या वतीने केलेला सत्कार पुढील कार्याला उर्जा देणार आहे, असे प्रतिपादन पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी पल्लवी झरेकर यांनी केले.
केडगाव भूषणनगर मधील ओम साई कॉलनीच्या रहिवासी असलेल्या उपजिल्हाधिकारी पल्लवी झरेकर यांना ‘सर्वोकृष्ठ उपजिल्हाधिकारी’ म्हणून सन्मानित करण्यात आल्याबद्दल तसेच डॉ.सुदर्शन झरेकर यांचा करोना योद्धा म्हणून, तसेच ओम साई कॉलनीतील उच्च श्रेणीने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कॉलनीमधील अध्यात्माचे अभ्यासक विठ्ठल तांदळे, लॉयर्स सोसायटीचे चेअरमन अॅड. नानासाहेब पादीर आदींसह ओम साई कॉलनीमधील नागरिक उपस्थित होते.
प्रास्ताविकात अॅड. नानासाहेब पादीर म्हणाले, उपजिल्हाधिकारी पल्लवी झरेकर या आमच्या कॉलनीच्या राहावासी असल्याचा अभिमान आम्हला आहे. करोनाच्या दुसर्या लाटेत त्यांनी जीवाची पर्वा न करता अहोरात्र केलेले काम आम्ही पाहिले आहे. त्यांचे पती डॉ. सुदर्शन झरेकर यांनीही सामाजिक जाणीव ठेवत डॉक्टर म्हणून खूप चांगले उपचार नागरिकांवर केले आहेत. तसेच ओम साई कॉलनी मधील अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उत्तुंग यश मिळवले आहे. उपजिल्हाधिकारी पल्लवी झरेकर यांच्या बरोबर गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार केल्याने त्यांनाही नवी प्रेरणा मिळेल.
या कार्यक्रमात हिमांशू चोरडिया, सिद्धी तांदळे, वैष्णवी मुळे, श्रेय बोरा, अनुष्का गायके, महेश पादीर, प्रथमेश सोहनी, स्वप्नील मुथा, ज्ञानेश्वर व मुक्ता झरेकर, श्रद्धा बडवे, पूनम चोरडिया आदी गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नितीन सोहनी, राजेंद्र बच्छाव, सुरजमल मुथा, रोहित बडवे, साचीन तांदळे, सुनील चोरडिया, शिवाजी धामणे, सुरेंद्र सोनी, सुनंदा पादीर, रजनी तांदळे, पल्लवी मुळे, कुसुम तांदळे, सुवर्णा चोरडिया, मीना बोरा, साधना मुथा आदी नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment