मनपा उद्यान विभागाची कामकाज सुधारण्यासाठी बैठक घेवून दिल्या सुचना - महापौर रोहिणी शेंडगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 7, 2021

मनपा उद्यान विभागाची कामकाज सुधारण्यासाठी बैठक घेवून दिल्या सुचना - महापौर रोहिणी शेंडगे

 मनपा उद्यान विभागाची कामकाज सुधारण्यासाठी बैठक घेवून दिल्या सुचना - महापौर रोहिणी शेंडगे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर महानगरपालिका उदयान विभागाची कामाबाबत मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी आज दि. 6/8/2021 रोजी बैठक घेतली. यावेळी संभाजी कदम, नगरसेवक शाम नळकांडे, विजय पठारे, अमोल येवले, माजी उपमहापौर अनिल बोरूडे, बबलू शिंदे, उपायुक्त यशवंत डांगे, उदयान विभाग प्रमुख मेहेर लहारे, आस्थापना विभाग प्रमुख अशोक साबळे, राजेश लयचेट्टी, किशोर कानडे आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर रोहिणीताई शेंडगे म्हणाल्या की, मनपाचे शहर व उपनगरामध्ये उदयाने आहेत. महालक्ष्मी उदयान तसेच गंगा उदयान ही दोन उदयाने मोठी आहेत. या दोन्ही उदयानाचे बीओटी तत्वावर विकासकाकडे देण्याचे प्रयोजन आहे. उदयानामध्ये मोठी झाडे आहेत. मनपा कर्मचार्‍यांने आपले काम काळजीपूर्वक करून मनपाचे हीत जोपासावे दिवसे दिवस नागरिकांना फिरण्यासाठी व लहान मुलांना खेळण्यासाठी उदयानाची आवश्यकता आहे. कै.बा.देशपांडे उदयान या ठिकाणी कचरा व साफ सफाई वेळेवर करण्यास सांगितले. सिध्दीबाग उदयानाच्या गेटजवळ असलेले सिमेंटचे मोठे पाईप हलविण्याबाबत कार्यवाही करावी. उद्यानामध्ये कचरा न जाळता त्या ठिकाणी बाजूला चौकोणी हौद बांधून पाल्या पाचोळ्या पासून खत तयार करण्यात यावे. तेच खत झाडांना वापरण्यात यावे. उद्यानामध्ये कर्मचार्‍यांनी साफ सफाई करून गवत व झाडे झुडपे स्वच्छ करण्यात यावे. मोठी उदयाने तसेच अमरधाम या ठिकाणी काळजीपूर्वक साफ सफाई करून तसेच ज्या सुविधा नाहीत त्या करण्यासाठी उदयान विभागाने बांधकाम विभागकडे प्रस्ताव सादर करण्यात यावे. सिध्दीबाग जवळील शंकर कारंजाची दुरूस्ती करण्यात यावी. तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा असे महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी सांगितले.
यावेळी उपायुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले की, मनपाच्या चारही झोनमध्ये लहान व मोठे पाच हजार वृक्ष लवकरच लावण्यात येणार आहे. डीपी रस्ते त्यासाठी वापरण्यात येणार आहे. वृक्षारोपन कार्यक्रम हाती घेतल्यामुळे शहराच्या वैभवात निश्चितच भर पडेल उदयान विभाग कर्मचा-यांनी आपआपली कामे जबाबदारीने पार पाडली गेली पाहिजे कामामध्ये निष्काळजीपणा दिसल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment