कर्नाटक पोलिसांना हवा असणारा वॉन्टेड आरोपी गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 25, 2021

कर्नाटक पोलिसांना हवा असणारा वॉन्टेड आरोपी गजाआड.

 कर्नाटक पोलिसांना हवा असणारा वॉन्टेड आरोपी गजाआड.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कर्नाटक राज्यात दरोडा व खुनाचे आरोप असणारा वॉण्टेड आरोपी संतोष नंदू भोसले हा त्याचे सासुरवाडी (वाकोडी फाटा ता नगर) येथे लपून राहात असल्याची माहिती कर्नाटक पोलिसांकडून मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील कलादगी पोलिस ठाणे हद्दीत अज्ञात आरोपीने दरोडा टाकून एका मुलीची हत्या करून व एका इसमास गंभीर जखमी करून 9 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 25,000/ रु. रोख रक्कम दरोडा टाकून चोरून नेली होती. या घटनेबाबत कलादगी पोलीस ठाणे, कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास करून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून आरोपी कुलकर्णी रामू चव्हाण (बिडकीन ता. पैठण जि औरंगाबाद) यास अटक केलेली आहे. परंतु अटक आरोपीचे इतर साथीदार फरार झाले होते. आरोपींची माहिती कर्नाटक पोलिसांनी अनील कटके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना कळविल्याने त्यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे फरार आरोपी यांचे वास्तव्य बाबत गोपनीय माहिती घेऊन अहमदनगर जिल्ह्यामध्ये शोध घेत होते. अनील कटके यांना माहिती मिळाली की गुन्ह्यात फरार असलेला आरोपी संतोष नंदू भोसले रा बिडकीन हा वाकोडी फाटा ता नगर येथे त्याचे सासरवाडीत लपून छपून राहत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सोमनाथ दिवटे, सुनील चव्हाण, मनोहर गोसावी, संदीप घोडके, विशाल दळवी, शंकर चौधरी. संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, रंजीत जाधव, जालिंदर माने, उमाकांत गावडे, यांनी मिळून वाकोडी फाटा येथे जाऊन सलग दोन दिवस सापळा लावून आरोपीस संतोष नंदू भोसले (वय 30 वर्ष तोंडेवाडी बिडकीन ता पैठण जि औरंगाबाद) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्यातील सहभागाबाबत माहिती दिल्याने त्यास पुढील तपास कामी कलादगी पोस्टे बागलकोट कर्नाटक राज्य पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
आरोपी नंदू भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुद्ध अहमदनगर, औरंगाबाद व नांदेड जिल्ह्यामध्ये खून, जबरी चोरी, घरफोडी चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई मनोज पाटील पोलीस अधिक्षक अहमदनगर, सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलिस अधिक्षक अहमदनगर यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment