अहमदनगर शहरांसाह उपनगरांचाही विकास करणार- उपमहापौर गणेश भोसले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, August 7, 2021

अहमदनगर शहरांसाह उपनगरांचाही विकास करणार- उपमहापौर गणेश भोसले

 अहमदनगर शहरांसाह उपनगरांचाही विकास करणार- उपमहापौर गणेश भोसले


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मा. नगरसेविका वीणाताई बोज्जा व बोज्जा परिवाराच्या वतीने अहमदनगर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित उपमहापौर पदी गणेशजी भोसले यांची निवड झाल्या बदल बोज्जा परिवाराच्या वतीने सुरेश बोज्जा कारभारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या वेळी मा. महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, मा. नगरसेवक जयंत येलूलकर, संपत नलावडे, राजेंद्र उदागे, दै. नवराष्ट्र चे जिल्हा ब्युरो संदीप रोडे, मा. नगरसेविका वीणाताई बोज्जा, सौ. किरण येनगंदूल श्रीनिवास बोज्जा व अथर्व बोज्जा आदी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना श्री भोसले म्हणाले अहमदनगर शहर व उपनगरा मध्ये हरित क्रांती करायची इच्छा असून मोठया प्रमाणात वृक्षरोपण व त्याचे संगोपन करण्याची गरज आहे या करिता महानगरपालिकेचे स्वतंत्र व्यवस्थापन निर्माण करून काम करणार आहे. रस्ते गटारी हे नित्याचे झाले आहे परंतु अहमदनगर शहर हे सुंदर दिसण्याकामी आज पर्यंत कोणी प्रयत्न केला नाही याची उणीव मी माझ्या पदाचा उपयोग करून करणार असून अहमदनगर शहारा बरोबरच उपनग्राचाही विकास करू असे भोसले म्हणाले
या वेळी मा. महापौर बाबासाहेब वकाळे, बाळासाहेब बोराटे व जयंत येलूलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उवस्थिताचे स्वागत मा नगरसेविका वीणाताई बोज्जा यांनी केले तर आभार श्रीनिवास बोज्जा यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here