महागाईमुळे पुन्हा टांगा युग येणार : सुहास मुळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, August 17, 2021

महागाईमुळे पुन्हा टांगा युग येणार : सुहास मुळे

 महागाईमुळे पुन्हा टांगा युग येणार : सुहास मुळे

जागरूक नागरिक मंचचे स्वातंत्र्यदिनी अनोखे आंदोलन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
देशाला स्वातंत्र मिळून 75 वर्ष झाले तरी अजूनही सर्वसामान्य नागरिक मुलभूत सोयीसुविधां अभावी व गरजा मिळत नाहीये. वाढत्या राक्षसी महागाई मुळे ग्रासला जात आहे. याचा निषेध नगरच्या जागरूक नागरिक मंचच्या वतीने स्वातंत्र्यदिनी करत अनोखे आंदोलन केले. महागाई मुळे लवकरच टांगा युग पुन्हा येणार असल्याने दिल्लीगेट येथे शहरातील एकमेव टांग्यासह स्वातंत्र्यचा अमृत मोहत्सव व महागाईचा सुवर्ण मोहत्सव, आकाशाला भिडलेली महागाई आवारा असा फलक लावलेले फुगे आकाशात सोडण्यात आली. जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे यांच्या संकालापानेतून हे अनोखे आंदोलन करण्यात आले.
यावेळी स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अहमदनगर शहरातील नागरिकांना शहराच्या विकासासाठी पाठ्य पुस्तकात असलेल्या भारत माझा देश... आहे या प्रतिज्ञेप्रमाणे अहमदनगर शहर माझे शहर आहे अशी... अशी शपथ व प्रतिज्ञा द्वारे जनजागृती करण्यात आली. व्ही आर डी ई मधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रमोद देशपांडे यांच्या हस्ते शेकडो नागरिकांना छापील प्रतिज्ञा वाटण्यात आल्या.
सुहास मुळे म्हणाले, आज स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनी देखील अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत विरोधात सामान्य जनतेला जर टोकाचा संघर्ष करावा लागत असेल तर निश्चितच खेदाची बाब आहे. त्यातच दोन वर्षांपासून लॉकडाउन मधे होरपळून निघालेल्या सामान्य माणसाचा महागाई टाहो मायबाप सरकार पर्यंत पोहचवणे आवश्यक असल्याने गॅसच्या फुग्यांद्वारे हा संदेश उंच बसलेल्या बेखबर सरकार कडे पाठवत आकाशात सोडण्यात आले आहेत.
यावेळी सर्वश्री सुनील पंडित, बाळासाहेब भुजबळ, कैलास दळवी, माजी महापौर भगवान फुलसौंदर, यांचीही भाषणे झाली. मंचचे सचिव कैलास दळवी, सदस्य राजेंद्र पडोळे, राजेंद्र टकले, योगेश गणगले, अमृत बोरा, प्रमोद देशपांडे, दत्ता गायकवाड, सुनील कुलकर्णी,बी.यू. कुलकर्णी, नंदप्रकाश शिंदे, जय मुनोत, सुनील भोसले, शारदा होशिंग, सुरेखा सांगळे, श्रीमती पठाण, आशा गायकवाड, मयुरी मुळे, प्रसाद कुकडे, अमेय मुळे, टांगा चालक बबनराव काळभोर इत्यादी नागरिक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here