पाणीपट्टी-घरपट्टी वाढीची भिती दाखवत स्टंटबाजी करणार्‍यांचा निषेध करत मालमत्ता मुल्यांकनास शहर काँग्रेसचा पठिंबा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 13, 2021

पाणीपट्टी-घरपट्टी वाढीची भिती दाखवत स्टंटबाजी करणार्‍यांचा निषेध करत मालमत्ता मुल्यांकनास शहर काँग्रेसचा पठिंबा

 पाणीपट्टी-घरपट्टी वाढीची भिती दाखवत स्टंटबाजी करणार्‍यांचा निषेध करत मालमत्ता मुल्यांकनास शहर काँग्रेसचा पठिंबा

करवाढ नसून, पुर्नमुल्यांकनाचा विषय- आयुक्त


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर महानगर पालिकेच्या आजच्या दि.12 रोजीच्या सर्वसाधारण सभेत नगर शहराची पाणीपट्टी व घरपट्टी वाढीचा विषय नसूनही काही स्टंटबाज करणार्यांनी पाणीपट्टी, घरपट्टी तिप्पट वाढणार अशी नगरकरांना भिती दाखवत जी कृती केली, ती हास्यास्पद असून, खरा विषय हा मालमत्ता पुर्नमुल्यांकनाचा आहे, असा खुलासा करत अहमदनगर शहर काँग्रेसचे नेते माजी अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी दिशाभुल करणार्यांचा तीव्र निषेध करत महापालिकेने नियमानुसार मालमत्ता पुर्नमुल्यांकन करावे, त्याला आम्ही शहर काँग्रेस पाठिंबा देत आहोत, असे सांगून तसे निवेदन मनपा आयुक्त शंकर गोरे, महापौर सौ.रोहिणी शेंडगे, उपायुक्त यशवंत डांगे यांना देण्यात आले.
 यावेळी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस उबेद शेख यांच्या नेतृत्वाखाली मनपा कार्यालयाच्या आवारात ‘रामनाम’ भजन, टाळ-मृदूंगाच्या तालात उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना म्हटले ‘रघुपती राघव राजाराम..’ आणि ‘ उघड दार देवा...’ ही दोन भजन ताल-सुरात उपस्थितांनी गायली. यामध्ये उबेद शेख, बाळासाहेब भुजबळ यांच्यासमवेत माजी पोलिस निरिक्षक तथा पक्षाचे शहर उपाध्यक्ष एम.आय.शेख, प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, भिंगार काँग्रेसचे संजय झोडगे, महिला काँग्रेसच्या रजनी ताठे, भिंगार महिलाध्यक्षा मार्गारेट जाधव, सचिव मुकुंद लखापती, रमेश कदम, माजी नगरसेवक रुपसिंग कदम, पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज खान, राजेश बाठिया, किरण अळकुटे, अनिल परदेशी आदिंचा सहभाग होता.
श्री.भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शहर पक्षाच्या शिष्टमंडळाने आयुक्त, उपायुक्त आणि महापौर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. आजच्या सभेत पाणीपट्टी, घरपट्टी वाढीचा नसून, शहरातील मालमत्ता पुर्नमुल्यांकनाचा असून, ज्या नवीन बांधाकामांसह मालमत्तेचे मुल्यांकन झाले नाही, अशांची नोंद करणे, असा विषय आहे, असे आयुक्त, उपायुक्त, महापौर यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
पाणीपट्टी, घरपट्टी वाढीचा विषय नसल्याबद्दल श्री.भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले. स्टंटबाजी करणार्यांनी नगरकरांना तिनपट पाणीपट्टी, घरपट्टी वाढणार असे सांगून नगरकरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण केले. मात्र मनपा प्रशासनाने योग्य खुलासा करत ही भिती दूर केली, असे यावेळी उबेद शेख यांनी सांगितले. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापासून नगरकर आर्थिक अडचणीत असल्याने त्यांच्यात भिती निर्माण करण्याचा प्रयत्न निंदनीय असून, पाणीपुट्टी, घरपट्टी वाढ होण्याऐवजी नगरकरांना त्यात सवलत मिळावी, अशी आमची मागणी राहिल; मात्र तत्पूर्वी मालमत्ता मुल्यांकन तर होवू द्या, असे श्री.भुजबळ यांनी सांगून मनपा प्रशासनासह उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment