गुणे आयुर्वेद महाविद्यालयात आ. अरुण जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, August 17, 2021

गुणे आयुर्वेद महाविद्यालयात आ. अरुण जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण

 गुणे आयुर्वेद महाविद्यालयात आ. अरुण जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष आ.अरुण जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपाध्यक्ष आ.संग्राम जगताप, सचिव डॉ.विजय भंडारी, प्राचार्या डॉ.संगीता देशामुख, उपमहापौर गणेश भोसले, प्रा.माणिक विधाते, ज्ञानदेव पांडूळे, वैशाली ससे, डॉ.समीर होळकर आदींसह महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
आ.अरुण जगताप यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ज्यांच्या मुळे आज आपण स्वातंत्र्यात जगतो आहे अशा स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण केले पाहिजे. करोना मुळे उद्भवलेली परिस्थिती आता बदलत असली तरी सर्वांनी नियमांचे पालन करावे. प्राचार्या डॉ.संगीता देशमुख यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महाविद्यालयाच्या आवारात नुकतेच ऑलम्पिक मध्ये पदक मिळवलेल्या सर्व भारतीय खेळाडूंचे अभिनंदन करणारे फलक लावण्यात आली होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here