मनपातर्फे बेबी किट साहित्यांचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 2, 2021

मनपातर्फे बेबी किट साहित्यांचे वाटप

 मनपातर्फे बेबी किट साहित्यांचे वाटप

राष्ट्रीय स्तनपान सप्ताहाचा शुभारंभ आमदार व महापौरांच्या हस्ते संपन्न.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर महानगरपालिकेच्या कै.बा.देशपांडे दवाखाना येथील प्रसुती झालेल्या महिलांसाठी व बाळांसाठी महिला व बाल कल्याण समितीमार्फत बेबी किटचे वाटप आ.संग्रामभैय्या जगताप व महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी आ. संग्रामभैय्या जगताप म्हणाले की, कै.बा.देशपांडे दवाखाना व सुतिकागृह यासाठी नगरचे नामवंत वकील व प्रमुख सामाजिक कार्यकर्ते कै.बळवंत बाबाजी उर्फ बाळासाहेब देशपांडे यांनी आपल्या अंतिम इच्छेनुसार स्थावर व जंगम मालमत्ता नगरपालिकेला स्वाधिन केली. गोर गरिब स्त्रीयांची माफक दरात प्रसुतीची सोय व्हावी स्त्रीयांची आणि मुलांची सवलतीच्या दरात औषधोपचाराची सोय व्हावी यासाठी कै.बा.देशपांडे दवाखान्याची स्थापना केली. समाजामध्ये असे अनेक दानशूर आहेत की, त्यांनी नगर शहरासाठी आपले स्वत:ची संपत्ती अर्पण केली आहे. या थोर पुरूषांच्या उदार देणगीमुळेच सुतिकागृह शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्हा व महाराष्ट्रात प्रसिध्द झाले आहेत असे ते म्हणाले.
यावेळी महापौर रोहिणीताई शेंडगे म्हणाल्या की, महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या मार्फत लहान मुलांसाठी 2000 नग बेबी किटचे तसेच बेडसिट 300 नग, 300 नग चादर, आदी साहित्याची वाटप करण्यात आले. 1 ते 7 ऑगस्ट 2021 रोजी राष्ट्रीय स्तनपान सप्ताह कार्यक्रमाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. मनपा मार्फत जननी सुरक्षा योजना, प्रसुती नंतर महिलांना अनुदान देणे , जननी सुरक्षा अंतर्गत वाहतुक व्यवस्था करणे, बाल रोग तपासणी करणे, मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया योजना राबविणे आदी कार्यक्रम आयोजीत केले जातात. रूग्णांना मोफत जेवण दिले जाते. कै.बा.देशपांडे येथील डॉक्टर व कर्मचारी यांनी कोरोना काळात देखील जीवाची पर्वा न करता काम केले आहे. कै.बा.देशपांडे दवाखाना नुतनीकरण व नविन इमारत बांधणे यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी केली आहे.त्याच लवकरच मंजूरी मिळेल असे महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी सांगितले.
यावेळी महिला बाल कल्याण समितीच्या सभापती लताताई शेळके यांनी सांगितले की, मला महिलासाठी कै.बा.देशपांडे दवाखाना या ठिकाणी उपयोगी साहित्य वाटप करण्याचा मानस होता. त्यासाठी समितीच्या माध्यमातून महिलांसाठी व बाळांसाठी बेबी किट व साहित्याचे वाटप केले. समितीच्या माध्यमातून शहरातील ओपन स्पेसमध्ये खेळणी बसविण्यात आली आहे असे त्या म्हणाल्या. यावेळी डॉ.नम्रता मकासरे डायटेशियन यांनी स्तनपानाचे फायदे काय आहेत याची माहिती दिली. आरोग्याधिकारी डॉ.सतिष राजूरकर यांनी माहिती दिली व आभार मानले.
याप्रसंगी महिला बाल कल्याण समितीच्या सभापती लताताई शेळके, उपसभापती सुवर्णाताई गेणप्पा, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर मालनताई ढोणे, नगरसेवक भैय्या गंधे, कुमार वाकळे, नगरसेविका सोनालीताई चितळे, अभिजीत खोसे, आरोग्याधिकारी डॉ.सतिष राजूरकर, डॉ.नम्रता मकासरे, मॅट्रन संगिता दळवी, आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment