शहर स्वच्छतेच व वृक्षसंवर्धनात नागरिकांनी सहकार्य करावे- आ. संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 3, 2021

शहर स्वच्छतेच व वृक्षसंवर्धनात नागरिकांनी सहकार्य करावे- आ. संग्राम जगताप

 शहर स्वच्छतेच व वृक्षसंवर्धनात नागरिकांनी सहकार्य करावे- आ. संग्राम जगताप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर मनपाच्या वतीने व उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून शहर स्वच्छ अभियाना सुरू करण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. त्यामुळे शहर स्वच्छते कडे वाटचाल करीत आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही व शहर स्वच्छ व सूंदर राहण्यास मदत होईल, रस्त्याच्या बाजूला वाढलेले गवत,चौकांचे सुशोभीकरण, रस्त्यावरील दगड,गोटे,माती उचलली जात आहे.नागरिकांनीही या अभियानात सहभागी होऊन सहकार्य करावे व रस्त्यावरती कोणीही कचरा किंवा घाण टाकू नये शहराचे विद्रूपीकरण करू नये याच बरोबर महापालिकेच्या माध्यमातून व वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांच्या माध्यमातून नगर शहर हरित शहर करण्याचा संकल्प सुरू केला आहे. आज पासून पुरातन वृक्षांची गणना सुरु केली आहे. लवकरच शहरांमध्ये 5 हजार वृक्ष लावून त्याचे संवर्धन केले जाणार असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
अहमदनगर महानगरपालिके च्या वतीने इम्पेरियल चौक ते चाणक्य चौक दरम्यान शहर स्वच्छता अभियान राबवून पुरातन वृक्षांच्या गणनेचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी उपमहापौर गणेश भोसले, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, आयुक्त शंकर गोरे, अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रदीप पठारे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, सामाजिक कार्यकर्ते संजय चोपडा, संजय शेंडगे, उपायुक्त यशवंत डांगे, उद्यान प्रमुख मेहर लहारे, दिपक गांगर्डे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, शहर स्वच्छता अभियान आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरांमध्ये सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता अभियान व वृक्ष संवर्धन तसेच हरित नगर या संकल्पना सुरु करण्यात आल्या आहेत, या संकल्पना यशस्वी करून दाखविणार आहे, ज्या ज्या भागाची स्वच्छता अभियान पूर्ण झाल्यानंतर शहर स्वच्छ व सुंदर दिसायला लागले आहे तरी नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे असे ते म्हणाले. मनपा आयुक्त शंकर गोरे म्हणाले की, महापालिकेच्या माध्यमातून आज इम्पेरियल चौक ते चाणक्य चौक दरम्यान स्वच्छता अभियान राबविण्यात आलेले आहे. याच बरोबर दि. 30 जुलै रोजी माळीवाडा परिसरात स्वच्छता अभियान राबविले होते माळीवाडा वेशी जवळ हुतात्मा स्तंभा जवळ अस्वच्छता निदर्शनास आली या ठिकाणी स्वच्छता करून मातीचा पोयटा टाकून फुलांची झाडे लावून सर्व परिसर हा स्वच्छ केला.

No comments:

Post a Comment