आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करा- आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 2, 2021

आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करा- आ. जगताप

 आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करा- आ. जगताप

आमदारांनी आंदोलनाचा इशारा देताच प्रशासनास जाग...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः यश पॅलेस ते स्टेट बँक मार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या भागातून अवजड वाहतूक सुरू असल्यामुळे दोन नागरिकांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व पोलीस प्रशासन यांच्याशी बैठक घेऊन अवजड वाहतुकीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्यानंतर तातडीने जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी संबंधित उड्डाणपुलाच्या कामाच्या ठेकेदारास व पोलिस प्रशासनास दिल्ली गेट व कोठी रस्त्यावरून जाणारी अवजड वाहतूक बंद करावी असे आदेश दिलेले असतानाही राजरोसपणे दिल्ली गेट व उड्डाणपुलाचे काम सुरू असलेला रस्ता यावरून अवजड वाहतूक होत आहे, उड्डाणपुलाच्या ठेकेदारांच्या यंत्रणेशी संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन मी सर्वांना विकत घेतले आहे असे सांगितले जर संबंधित ठेकेदारा सोबत प्रशासनाचे लागेबांधे असेल तर चुकीच्य धोरणामुळे,नियोजनाच्या अभावामुळे दोन जणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे अजून किती जणांच्या मृत्यूची वाट पाहायची असा सवाल आ.संग्राम जगताप यांनी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भोसले,कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश माणगावकर व उड्डाणपुलाचे अधिकारी दिवान यांना केला.
आमदार संग्राम जगताप यांनी सक्कर चौकात आंदोलनाचा इशारा देतात प्रशासन खडबडून जागे झाले व नगर शहरातून होणारी अवजड वाहतूक ताबडतोब बंद करण्यात आली, पोलिस प्रशासनाच्या वतीने बॅरिगेट्स लावण्यात आली, उड्डाणपुलाच्या ठेकेदाराकडून ठिकाणी कामावरती वॉचमेनची संख्या वाढवण्यात आली तसेच उड्डाणपुलाच्या महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजवण्याच्या व दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे संबंधितांवर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले जातील असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने आ.संग्राम जगताप यांना देण्यात आले. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी उपमहापौर गणेश भोसले, शहराध्यक्ष माणिक विधाते, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, सुरेश बनसोडे, अभिजित खोसे, निलेश बांगरे, वैभव ढाकणे, जॉय लोखंडे, संतोष ढाकणे, वीरेंद्र सागर गुंजाळ, मळू गडाळकर, सोनू घेमुड, चेतन अग्रवाल आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment