किरण काळे यांनी भेटीचा विपर्यास करु नये ः आ. निलेश लंके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, August 10, 2021

किरण काळे यांनी भेटीचा विपर्यास करु नये ः आ. निलेश लंके

 किरण काळे यांनी भेटीचा विपर्यास करु नये ः आ. निलेश लंके


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः दररोज मला राज्यभरातील  हजारो लोक भेटतात. त्याच प्रकारे काँग्रेसचे युवा कार्यकर्ते किरण काळे त्यांच्या सहकार्‍यांसह मला घरी भेटले. या भेटीत कोणतीही राजकिय चर्चा झालेली नाही. कोरोना काळात नागरीकांना मदत महत्वाची आहे. ही वेळ राजकारणाची नाही. निवडणूकांची सध्या वेळ नाही. त्यामुळे कोणास विरोध करण्याची किंवा कोणाला पाठबळ देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. कोणाचे कोणाशी राजकिय वैर असेल तर त्याच्याशी आपला सबंध जोडू नये. काळे यांनी भेटीचा विपर्यास करून गैरसमज करू नये असा खुलासा आमदार नीलेश लंके यांनी केला आहे.
या भेटीमध्ये कोरोना काळात आम्ही केलेल्या कामाविषयी त्यांनी माझा सत्कार करण्याची इच्छा प्रकट केली होती. आपण त्यांनी आणलेला हार त्यांनाच देत कोरोना काळात नागरीकांची सेवा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ते तेथून निघून गेले. माला भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तींशी मी कधीही बंद दाराआड चर्चा करीत नाही. जी काही चर्चा होते ती सर्वांसमक्षच होते हे सर्वजण जाणतात.
जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्याचा नेहमीच प्रमाणीकपणे प्रयत्न करीत आहे. कोणी कोणत्याही भेटीचा विपर्यास करून दुही माजविण्याचा प्रयत्न करू नये असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजितदादा पवार, सुप्रियाताई सुळे, जयंत पाटील, हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली मी राजकारण करीत आहे. राजकारणाच्या वेळी राजकारण करण्यास आम्ही सक्षम आहोत. पक्षांतर्गत राजकारण आम्हाला  मान्य नाही. ते यापूर्वीही कधी केले नाही व यापुढेही करणार नाही असेही आ. लंके यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here