आमदार, खासदार, शासकीय कार्यालयांसमोर शिक्षकांचे 17 ऑगस्टला भिक मागो आंदोलन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 6, 2021

आमदार, खासदार, शासकीय कार्यालयांसमोर शिक्षकांचे 17 ऑगस्टला भिक मागो आंदोलन.

 आमदार, खासदार, शासकीय कार्यालयांसमोर शिक्षकांचे 17 ऑगस्टला भिक मागो आंदोलन.

पुरोगामी महाराष्ट्रातील शिक्षकांवर भीक मागण्याची वेळ...; पगार नसेल तर संसार कसा चालवायचा?


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शिक्षक कोरोनाच्या काळात देखील  वेगवेगळ्या ड्यूटी करत आहेत.शासनाने दिलेले सर्व शैक्षणिक कामे करत आहेत.परंतु वेळेवर पगार नसेल तर त्या शिक्षकांचा संसार कसा चालेल तरी .12 ऑगस्ट पर्यंत आमच्या मागण्यांचा विचार शासनाने केला नाही तर संघटनेच्या माध्यमातून  शिक्षक 17 ऑगस्ट रोजी सर्व शासकीय कार्यालयात,आमदार कार्यालय,खासदार कार्यालय उपोषण भीक मागो आंदोलन करणार असल्याचा इशारा कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष काळापहाड, शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष अंबादास शिंदे, यांनी जिल्हाधिकार्‍यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शा.नि दिनांक 15/02/2021  नुसार 20 टक्के अनुदान प्राप्त शाळांना 40 टक्के अनुदानासाठी  काही कागदपत्रे अभावी अपात्र करण्यात आले. सदर शाळा या 20 टक्के अनुदान पात्र असून सदर शाळांनी शासनाने दिलेल्या त्रुटी पूर्ततेसाठी प्रस्ताव सादर करुन योग्य ते कागदपत्रे सादर केले  आहेत. या वेळी अपात्र झालेल्या शाळांचे 20 टक्के प्रमाणे होत असणारे वेतन थांबवले आहे. वेतन अधीक्षक कार्यालयाकडून तोंडी आदेशाद्वारे सदर शाळांचे वेतन थांबवले आहेत.  याबाबत शिक्षकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे मिळणारा पगार हा  8 हजार असून यासाठी शिक्षकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे.शासनाने दिलेल्या वेळेत त्रुटींची पूर्तता करून देखील शासनाकडून अध्याप पात्र शाळांच्या याद्या जाहीर झालेल्या नाहीत संघटनेच्या माध्यमातून अशी विनंती केली आहे. 20% पात्र परंतु 40% अपात्र शाळांचे पगार नियमित सुरू करावेत. व अपात्र शाळांच्या याद्या शासन निर्णयाद्वारे निधी सह घोषित करण्यात याव्यात असेही निवेदनात म्हटले आहे.कास्ट्राईब शिक्षक शिक्षकेतर संघटना शहराध्यक्ष प्रसाद शिंदे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आंबादास शिंदे,पारुनाथ ढोकळे, यांचे  वतीने मा.श्री मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य  उद्धवजी ठाकरे यांनाही निवेदन देण्यात आले असून शासन निर्णय दिनांक 15/02/2021 अन्वये 20 टक्के अनुदान सुरू असलेले परंतु 40% अनुदानास  अपात्र ठरलेल्या खाजगी प्राथमिक शाळा तुकड्यांचे वेतन सुरू करावे. अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रसंगी कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष संतोष काळापहाड,सुरज घाटविसावे,शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष अंबादास शिंदे ,शहराध्यक्ष पारुनाथ ढोकळे.कांतीलाल खुरंगे,रविंद्र आगलावे,शहराध्यक्ष प्रसाद शिंदे,रवी चांदेकर, अशोक शिरसाठ व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment