पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिमुकली ‘अनिषा’चा ई-मेल. मला.. तुम्हाला भेटायचंय! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, August 12, 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिमुकली ‘अनिषा’चा ई-मेल. मला.. तुम्हाला भेटायचंय!

 पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिमुकली ‘अनिषा’चा ई-मेल. मला.. तुम्हाला भेटायचंय!

आ.राधाकृष्ण विखेच्या नातीशी मोदींनी मारल्या गप्पा.

दोन दिवस बाबा सुजय विखेंचा पिच्छा सोडला नाही. रोज सुजय सांगायचे, बेटा ते प्राईम मिनिस्टर आहेत. ते कामात असतात. पण तिचा हट्ट सुरूच. अखेर, मी अनिषा आहे आणि मला तुम्हाला भेटायचंय असा बाबांच्या ईमेलवरून थेट पंतप्रधानांना मॅसेज पाठवला... आणि आश्चर्य! थोड्याच वेळात मेलवर रिप्लाय आला.. त्यात भेटण्याची वेळे नमूद होती.. मोदींनी अनिषाचा हट्ट पुरवला सहकार, शिक्षण आणि राजकारण यात मोठा वकुब ठेवून असलेले आणि राजकीय सत्तेच्या वर्तुळात नेहमीच मुख्य ठिकाणी विराजमान असलेले राज्यातील एक राजकीय घराणे म्हणजे विखे पाटील कुटुंब.. पद्मश्री (स्व) डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, पदमविभूषण माजी केंद्रीय मंत्री (स्व) बाळासाहेब विखे पाटील, माजी विरोधीपक्ष नेते, भाजप आ.राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप खासदार डॉ.सुजय विखे पाटील असा समाजकारणात आणि राजकारणात चार पिढ्यांचा मोठा वारसा असलेले लोणी-प्रवरेचे विखे पाटील कुटुंब हे नेहमीच चर्चेत राहिले आहे. आता विखे पाटील परिवाराची पाचवी  पिढीची वारस अनिषा अर्थात खा.सुजय आणि डॉ.धनश्री  यांची मुलगी अनिषा ही  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी नंतर चर्चेत आली आहे.


नवी दिल्ली -
खा.सुजय विखे, डॉ.धनश्री सुजय विखे ची कन्या अनिषाचा अर्थात हा चिमुकल्या अनिषाचा वडील खा.सुजय यांच्याकडे आग्रह होता की मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायचे आहे. आता मोदींना भेटणे किंवा त्यांची वेळ मिळणे काय असते हे खा.डॉ.सुजय जाणून होते. कदाचित आजोबा आ.राधाकृष्ण विखेंनी तिची समजुतही काढली असेल पण, अनिषाने मग थेट स्वतः वडील खा.सुजय यांच्या मेल वरून पंतप्रधान अंकल मोदी साहेबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि काय आश्चर्य.. देशाच्या पंतप्रधानांनी मेल ला उत्तर देत भेटीची वेळ दिली. आणी आज आमदार राधाकृष्ण विखे, खा.सुजय विखे, धनश्री विखे समवेत अनिषाने पंतप्रधान नरेंद्र मोदी ची भेट घेतली.
निश्चितच हा विखे पाटील परिवारासाठी मोठा गौरवाचा दिवस म्हंटला पाहिजे. विखे परिवार चिमुकल्या अनिषासह पंतप्रधान मोदींना भेटण्यास निवासस्थानी दाखल झाला. यावेळी अनिषा सोबत पंतप्रधान मोदींनी आजोबांच्या भूमिकेत येत तिच्याशी बातचीत केली, तर निरागस अनिषाने त्यांना पाटीलबाणा दाखवत काही प्रश्नही केले.. तुम्ही गुजराथचे का.. तुम्ही इथे बसता का?, हे तुमचे ऑफिस का!!?  तुम्ही राष्ट्रपती केंव्हा होणार..?? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती तिने निरागस आणि कुतूहलतेपोटी केली. मोदींनी हसत तिच्या प्रश्नांची मिश्कीलपणे उत्तरे देत तिचे कौतुक केले.. ’मी तुझ्या भेटीला खास आलोय’ असे पंतप्रधान यावेळी अनिषाला म्हणाले. यावेळी विखे कुटुंबाने फुलांचा बुके देऊन पंतप्रधान मोदींचे आभार मानले. या भेटीचे फोटो व्हायरल झाले असून माध्यमांनी या नात अनिषा आणि आजोबा मोदींच्या अल्पशा भेटीची चांगलीच दखल घेतली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here