पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी सहकारी पतसंस्थेला 92 लाख रुपयांचा निव्वळ नफा-चेअरमन उमेश डावखर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, August 21, 2021

पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी सहकारी पतसंस्थेला 92 लाख रुपयांचा निव्वळ नफा-चेअरमन उमेश डावखर

 पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी सहकारी पतसंस्थेला 92 लाख रुपयांचा निव्वळ नफा-चेअरमन उमेश डावखर

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचार्यांची सहकारी पतसंस्थेला सन 2020-2021 या आर्थिक वर्षात सुमारे 92 लाख 18 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन उमेश सदाशिव डावखर यांनी दिली.
पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचार्यांची सहकारी पतसंस्थेची स्थापना होऊन 75 वर्षे झालेली असून, संस्थेने अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र अहमदनगर जिल्हा असून, संस्थेची संगमनेर, श्रीगोंदा, श्रीरामपूर, शेवगाव या सभासदांच्या सोईसाठी चार शाखा कार्यरत आहेत. संस्थेची सभासद संख्या 2019 असून, स्वतःचे भाग भांडवल 8 कोटी 42 लाख रुपये आहेत. संचित ठेवी रुपये 33 कोटी 61 लाख आहेत. वार्षिक उलाढाल 212 कोटी झाली आहे. सभासदांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी संस्थेने सुमारे 74 कोटी 26 लाख कर्ज वाटप केलेले आहे. संस्थेला 2020-2021 या आर्थिक वर्षात एकूण ढोबळ नफा 8 कोटी 51 लाख रुपये इतका झाला आहे. सर्व तरतुदी व खर्च वजा जाता संस्थेस सुमारे 92 लाख 18 हजार रुपये निव्वळ नफा झालेला असल्याचे चेअरमन उमेश डावखर व व्हाईस चेअरमन अजय लखापती यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
आर्थिक वर्षाअखेर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे मंजूर कॅश क्रेडिट रुपये 20 कोटी पैकी प्रत्यक्षात 32 लाख 32 हजार इतकी उचल झालेले असून, जिल्हा सहकारी बँकेस शेअर्स कोटी 2 कोटी 50 लाख व रिझर्व्ह फंड खाती 15 कोटी 63 लाख रुपयाची गुंतवणूक केलेली आहे. संस्थेच्या आकर्षक ठेवीचे व्याजदरमुळे मुदत ठेवी संस्थेत जमा होत आहेत. आर्थिक वर्षाअखेर संस्थेत सुमारे 40 कोटी 83 लाखांचे ठेवी जमा आहेत. संचालक मंडळाने आर्थिक वर्षात संस्थेच्या सभासदांच्या आर्थिक हिताची जपवणूक करून अत्यंत काटकसर व पारदर्शी कारभार केला असून, खर्चात जास्तीत जास्त काटकसर केलेली आहे. थकबाकी वसूल करणे व थकबाकी प्रमाण कमी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन या नात्याने काम करताना व्हाईस चेअरमन अजय लखापती, सर्व शाखा कार्यभार प्रमुख, संचालक मंडळ, संस्था मुख्य कार्यकारी अधिकारी न्यानेश्वर हळगावकर सभासद व संस्थेचे कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे चेअरमन यांनी सांगितले आहे.
संस्थेच्या प्रगतीपथावर असलेल्या उत्कृष्ट व पारदर्शी कारभारासाठी चेअरमन उमेश डावखर, व्हाईस चेअरमन अजय लखपती, संगमनेर शाखा कार्यभार प्रमुख ललित पवार, श्रीगोंदा शाखा कार्यभार प्रमुख अभिमन्यु घोलवाड, श्रीरामपूर शाखा कार्यभार प्रमुख शिवाजी तोरणे, शेवगाव शाखा कार्यभार प्रमुख चंद्रकांत पडोळे, संचालक नारायणराव तमनर, नवनाथ घोंगडे, नामदेव बोरुडे, शांताराम आवारी, दीपक वाळके, यादव उदागे, राधाकिसन आभाळे, संजय गायके, दत्ताराम गडाख, सिताराम गागरे, गणेश बोबडे, राजेंद्र परदेशी, संचालिका प्रियंका मिसाळ, व कर्मचारी वृंद तसेच सभासदांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here