विकेंड लॉकडाउनचा बोजवारा ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, August 9, 2021

विकेंड लॉकडाउनचा बोजवारा !

 विकेंड लॉकडाउनचा बोजवारा !

पोलिस व मनपा प्रशासनाकडून कारवाई..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शनिवार-रविवार वीकेंड लॉकडाउन असताना शहरातील मुकुंद नगर, गोविंदपुरा, फकीर वाडा या ठिकाणी भिंगार पोलीस ठाण्याचे पथक व महापालिकेच्या पथकाने धडक मोहीम राबवित दुकाने सुरू ठेवणार्‍यांवर कारवाई करत 20,400 रुपयांचा दंड वसूल केला. (दि 7 ऑगस्ट) मंगल गेट, कोठला, कल्याण रोड, बालिकाश्रम रोड, चितळे रोड, कॉटेज कॉर्नर, तपोवन रोड, राज चेंबर्स परिसर औरंगाबाद रोड या ठिकाणी महापालिका कोरोना दक्षता पथक आणि तोफखाना पोलीस यांनी दि.8 रोजी संयुक्तपणे करून 70 विनामास्क, 14,000/- आणि 5 दुकानांनवर 25,000/- असे एकूण 39,000/- रु तर 14 पावत्या व 6800/- रु दंडात्मक कारवाई अशी वसूली करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विविध दुकाने, आस्थापना यांना निर्बंध लावलेले आहेत. सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत दुकाने व आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी आहे तर शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊन आहे. तरीही मुकुंदनगर, गोविंदपूरा, फकीरवाडा परिसरात कुठल्याही निर्बंधांचे पालन न करता सर्व व्यवहार सुरळीत सुरू राहत असल्याची माहिती भिंगार कॅम्प पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स.पो.नि. शिशिरकुमार देशमुख यांनी महापालिकेच्या दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी शशिकांत नजान यांच्याशी संपर्क साधून संयुक्त कारवाईची मोहिम आखली. त्यानुसार शनिवारी दुपारी ही कारवाई सुरू करण्यात आली. गोविंदपूरा परिसरात 6 ते 7 दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर मुकुंदनगर परिसरात मेन चौक ते दरबार चौक परिसरात 8 ते 10 दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाईची मोहिम सुरू झाल्याचे कळताच या परिसरातील दुकाने सुरू ठेवलेल्या दुकान मालकांमध्ये धावपळ उडाली. अनेकांनी तातडीने दुकाने बंद केली. दुपारी उशिरापर्यंत ही कारवाईची मोहिम सुरू होती.
स्टेशनचे पी.एस.आय. समाधान सोळंकी, पोलीस हवालदार जपे, केरुळकर, शिरसाट, नरसाळे आदी कारवाईत सहभागी होते. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे साहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलिस कर्मचारी भानुदास खेडकर, अरुण मोरे, राहुरी गोरे, राहुल द्वारके यांच्यासह महापालिकेच्या दक्षता पथकाचे सनियंत्रण अधिकारी शशिकांत नजन, नंदकुमार नेमाणे, राहुल साबळे, राजेश आनंद, अनिल आढाव, रिजवान शेख, नंदू रोहोकले, राजेंद्र बोरुडे, गणेश वरुटे, राजू जाधव, विष्णू देशमुख, अजित मोहिरे, श्री. कांगुर्डे आदींच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here