शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने झेंडावंदन उत्साहात संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 16, 2021

शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने झेंडावंदन उत्साहात संपन्न

 शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने झेंडावंदन उत्साहात संपन्न


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने सालाबाद प्रमाणे काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर दीप चव्हाण होते.
यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, स्वातंत्र्याला आता 74 वर्षे होत आहेत. हे सबंध वर्ष संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार आहे. दीडशे वर्षांचा इंग्रजांच्या राजवटीशी संघर्ष करत या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यासारख्या असंख्य स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिलेले आहे. या स्वातंत्र्य चळवळीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे योगदान मोठे आहे.
यावेळी यश आसाराम पालवे या चिमुरड्याच्या हस्ते आकाशात फुगे सोडून स्वातंत्र्याचा आनंद काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. दिप चव्हाण, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जागीरदार आदींनी आपले विचार यावेळी व्यक्त केले.
यावेळी शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. अक्षय कुलट, क्रीडा विभाग शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुजित जगताप, विद्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, माजी नगरसेविका जरीना पठाण, महिला काँग्रेसच्या उषाताई भगत, वाघमारे ताई, शहर जिल्हा सचिव मुबिन शेख, शहर जिल्हा सचिव अन्वर सय्यद, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, विद्यार्थी काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष दानिश शेख, कॅप्टन रिजवान शेख, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, आय.बी. शहा, राहुल गांधी विचार मंचाचे शहराध्यक्ष सागर निर्मल, अथर सय्यद आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment