सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह चौघांना वंजारवाडी ग्रामस्थांकडून अमानुष मारहाण. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 10, 2021

सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह चौघांना वंजारवाडी ग्रामस्थांकडून अमानुष मारहाण.

 सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह चौघांना वंजारवाडी ग्रामस्थांकडून अमानुष मारहाण.

‘पोलीस’ ठरले चोर!

ग्रामस्थ म्हणतायेत.. चोरांनीच (पोलीसांनी) केली मारहाण; खोटे गुन्हे मागे घेण्याचे वंजारवाडी धानोरा ग्रामस्थांचे निवेदन.


जा
मखेड - गावरान कोंबडी खरेदी करण्यासाठी आलेल्या पोलिस निरीक्षकांसह चौघांना अमानुष मारहाण करणार्‍या जामखेड तालुक्यातील अरणगाव मधील वंजारवाडी व धानोरा ग्रामस्थांवर काल जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. हे खोटे गुन्हे असून ते तात्काळ मागे घेण्याचे निवेदन वंजारवाडी व धानोरा ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना दिले आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की शुक्रवार दि. 6 आँगस्ट रोजी अरणगाव परिसरात गावरान कोंबडी खरेदी करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह चौघेजण चारचाकी वाहनातून आले होते. ग्रामस्थांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु वाहन न थांबल्याने दुचाकीस्वारांनी चारचाकी वाहनाला दुचाकी आडवी घालून वाहन थांबवून जमलेल्या 20 ते 25 जणांनी या वाहनावर मोठ्या प्रमाणात दगडफेक करून वाहनातील सहाय्यक पोलीस निरीक्षकसह चौघांना बाहेर काढून लोखंडी रॉड, बांबू, दगड व काठीने मारहाण केली. याबाबत जामखेड पोलिसात खूनाच्या प्रयत्न विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
हे गुन्हे दाखल झाल्यानंतर वंजारवाडी ग्रामस्थ आक्रमक झाले असून हे गुन्हे खोटे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वंजारवाडी ग्रामस्थांनी नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांना निवेदन दिले असून निवेदनात म्हटले आहे, की प्रतिष्ठित व्यक्तीवर 307 सारखा खोटा गुन्हा दाखल केला. तो चार दिवसात मागे घेण्यात यावा, अन्यथा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा वंजारवाडी ग्रामस्थांनी दिला आहे. वंजारवाडी येथील ग्रामस्थांनी नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शुक्रवार दि. 6 आँगस्ट रोजी मधुकर दत्तू जायभाय, शिवाजी बाबासाहेब जायभाय, आशाबाई व हनुमंत जायभाय यांचे घराचे कुलूप कडी तोडून कपाटातील डब्यातील पैसे व दागिने दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान चोरी झाली. याची माहिती समजल्यानंतर व ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या नंबर वरती फोन आल्यावर गावातील व बाहेरगावातील तरूणांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला.  सदर चोरांनी उलटसुलट भाषा करून विचारपूस करणा-यांना मारहाण केली. चोरांनीच गाडीच्या काचा फोडल्या. यावेळी चोर व जमावामध्ये बाचाबाची झाली त्यावेळी अरणगाव येथील काही लोकांनी चोरांना व जमावाला बाजुला केले. चोरांनीच वंजारवाडी येथे ज्यांच्या घरी चोरी झाली त्यांच्यावर व प्रतिष्ठित व्यक्तीवर 307 सारखा खोटा गुन्हा दाखल केला. सदर चोरांनी दाखल केलेला खोटा गुन्हा येत्या चार दिवसात मागे घेण्यात यावा अन्यथा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनावर संजय जायभाय, उध्दव नागवडे, कांतीलाल जायभाय, दत्ता फुंदे, मनोज जायभाय, भगवान जायभाय, रमेश ओमासे, सोमनाथ जायभाय यांच्यासह दोनशे ग्रामस्थांच्या सह्या आहेत. नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांनी वंजारवाडी ग्रामस्थांनी दिलेले निवेदन स्विकारून याबाबत वरिष्ठांना माहितीस्तव पाठवण्यात येईल व त्यांच्या मार्गदर्शना नुसार कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे.

No comments:

Post a Comment