रिक्षा चालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, July 2, 2021

रिक्षा चालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार

 रिक्षा चालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार

आ.संग्राम जगताप यांच्याकडून रिक्षाचालकांना किराणा किट वाटप


माजाच्या दृष्टीने रिक्षाचालक हा महत्वाचा घटक आहे व्यवसाय करीत असताना रिक्षाचालकांचा प्रामाणिकपणा वारंवार दिसून येते आहे.रिक्षाचालकांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर काम करावे,यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्याकडे रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. हे महामंडळ स्थापन झाल्यानंतर रिक्षाचालकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेता येईल. गेल्या दीड वर्षापासून कोरोणा संसर्ग विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.कोरोणा हा विषाणू संसर्गजन्य विषाणू असल्यामुळे एका व्यक्तीपासून अनेकांना संसर्ग होण्याची भीती आहे त्यामुळे सरकारने अनेक वेळा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे गोरगरीब जनतेचे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे आम्ही कोरोना संकट काळामध्ये मानवतेच्या भावनेतून वर्षभर मदत करत आहोत, कोरोणाच्या पहिल्या लाटेमध्ये शहरातील गोरगरीब कुटुंबांना मोठ्या प्रमाणात किराणा किटचे वाटप केले होते. याच बरोबर कोरोना रुग्णांवर योग्य रीतीने उपचार व्हावे वेळेवर औषध मिळावे याच बरोबर सुविधा मिळाव्या रुग्णालयांच्या सुविधा मिळावा यासाठी अहोरात्र कष्ट करून अनेकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.या दुसरा लाटेमुळे अनेकांच्या हाताचे काम गेले आहे शहरातील रिक्षाचालक व घरेलू कामगार यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता. यासाठी आज किराणा किटचे वाटप करण्यात आले असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
आ.संग्राम जगताप मित्र मंडळाच्या वतीने व घरेलू कामगार यांना किराणा किटचे वाटप करण्यात आले यावेळी आमदार संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, शहर जिल्हा अध्यक्ष माणिकराव विधाते,महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे,अजिंक्य बोरकर, अभिजित खोसे, दत्ता वामन, नगरसेवक मनोज कोतकर,नगरसेवक प्रकाश भागानगरे, सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, विलास कराळे, साधना बोरुडे, बाळासाहेब जगताप, संतोष ढाकणे, जय लोखंडे, घनश्याम सानप, साहेबांन जागीरदार, भूषण गुंड आदी उपस्थित होते.
उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, कोरोणाच्या संकट काळामध्ये प्रत्येक नागरिक भयभीत झाला आहे.त्यांना आधार देण्याचे काम आमदार संग्राम जगताप यांनी केले.त्यांनी केलेले काम हे कौतुकास्पद आहे आपल्या जीवाची पर्वा न करता या दुसर्‍या लाटेमध्ये कोरोना रुग्णांवर योग्य ते उपचार व्हावे यासाठी अहोरात्र झटत होते, रिक्षा चालकांना उदरनिर्वाहाचा प्रश्न दूर करण्यासाठी आमदार संग्राम जगताप ये प्रयत्नशील आहेत.
स्थायी समिती सभापती अविनाश घुले म्हणाले की,कोरोनाच्या संकट काळामध्ये रिक्षाचालकांच्या व्यवसाय मध्ये मोठी घट पडले असेले मुळे त्यांच्या वर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.आमदार संग्राम जगताप यांनी सर्वसामान्य व गोरगरीब कुटुंबांना मदत करण्याचे काम केले आहे.रिक्षाचालकांना कोरोनाचा संकट काळामध्ये आर्थिक मदत मिळवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला.लवकरच सर्व रिक्षा चालकांना ही मदत मिळणार आहे.सर्व रिक्षा चालकांनी संघटित व्हावे व आपले प्रलंबित प्रश्न आमदार संग्राम जगताप यांच्याकडून सोडवून घ्यावे असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here