जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे उपोषण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 24, 2021

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे उपोषण

 जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे उपोषण

मयत शिवाजी सावंत मृत्यू प्रकारणाच्या चौकशीची मागणी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील नाथपंथी डवरी गोसावी समाजातील कार्यकर्ता शिवाजी एकनाथ सावंत यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून सदर घटनेस जबाबदार असणार्‍या घोडेगाव येथील अशोक नहार, अजय नहार, अक्षय नहार यांना अटक करावी तसेच तपासात हलगर्जीपणा करणार्‍या सोनई पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर योग्य ती कारवाई करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे भटके विमुक्त सेलचे सहसमन्वयक अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली नगर येथील पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
या संदर्भात अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव, प्रतिक बारसे, काशीनाथ चौगुले, सावित्री सावंत, यांनी भेट घेऊन पुन्हा निवेदन दिले असता. योग्य ती कारवाई करू असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र याप्रकरणी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी लोकशाही मार्गाने आपले आंदोलन सुरूच ठेवले असे अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडी अहमदनगर दक्षिण चे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, जिल्हा महासचिव योगेश साठे, संघटक फिरोज पठाण, जामखेड तालुकाध्यक्ष आतिष पारवे, नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे प्रतिनिधी काशीनाथ चौघुले, दया सावंत, संतोष शेगर, अजिनाथ शिंदे, मयत शिवाजी सावंत यांचे आई, वडील लिलाबाई सावंत, एकनाथ सावंत, पत्नी सावित्रीबाई सावंत, मुले अर्जुन सावंत, चेतन सावंत, अरुण सावंत यांच्यासह घोडेगाव व जामखेड येथील नाथपंथी डवरी गोसावी समाजातील महिला, युवक या उपोषणात सहभागी झाले होते.
या पूर्वी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी करणारे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना 29 जुलै रोजी देण्यात आले होते. मात्र निवेदन देऊन 1 महिन्याचा कालावधी उलटला तरीही सदर प्रकरणी पोलिसांकडून कुठलीही कारवाई झाली नाही त्याच्या निषेधार्थ 23 जुलै रोजी पुन्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. यानंतरही नाथपंथी डवरी गोसावी समाजाला न्याय मिळाला नाही. तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल अशा इशारा अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव, प्रतिक बारसे व योगेश साठे यांनी दिला.
सकाळी 12 वा. वंचित बहुजन आघाडीचे निवडक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच जामखेड व नेवासा तालुक्यातील नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे प्रतिनिधींनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बसून जोरदार घोषणाबाजी केली.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी शेवगाव चे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांना सदर प्रकरणाशी संबंधित आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. त्यामुळे वंचित बहुजना आघाडीने पुकारलेले लाक्षणिक उपोषण दुपारी 4 वा. थांबवले. मात्र आरोपींना अटक न झाल्यास वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व नाथपंथी डवरी गोसावी समाज बांधव जल संधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांच्या निवासस्थानावावर मोर्चा काढतील अशा इशारा ऍड. डॉ. अरुण जाधव यांनी दिला.
सदर गुन्ह्यातील आरोपींना त्वरित अटक करावी. मयत शिवाजी सावंत यांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळावी. शिवाजी सावंत कुटुंबियांचे पुनर्वसन करावे. सदर खटला जलदगती न्यायालायत चविण्यात यावा अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी उत्तम सावंत, भीमराव सावंत, आशा चव्हाण, फुलाबाई शेगर, संतोष चव्हाण, शंकर चव्हाण, मोहन चव्हाण, सर्जेराव शेगर, मोहन शिंदे, शिवाजी शिंदे, पिराजी शिंदे, तालिबान शेगर, प्रकाश शेगर, अर्जुन शेगर, आकाश शेगर, मोहन शेगर, शिवराम सावंत, विकास शिंदे आदी कार्यकर्ते या उपोषणास उपस्थित होते.

No comments:

Post a Comment