राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त शाखेचे उद्घाटन, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 7, 2021

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त शाखेचे उद्घाटन, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण

 राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त शाखेचे उद्घाटन, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः राज्यमंत्री माननीय बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने कोपरगाव तालुक्यात साजरा करण्यात आला.
कोपरगाव तालुक्यात आपेगाव गावातील असंख्य युवा वर्गाने प्रहार मध्ये प्रवेश केला व त्या माध्यमातून भाऊंच्या वाढदिवसानिमित्त भव्यदिव्य असे शाखेचे उद्घाटन व रक्तदान शिबिर, वृक्षारोपण करण्यात आले.
त्याप्रसंगी त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ वकील योगेश खालकर व मेजर साहेब त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थिती व प्रहार सैनिकांना मार्गदर्शन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक - श्री. अभिजित कालेकर, अपंग क्रांतीचे श्री.परमेश्वर कराळे, प्रहारचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे, जिल्हा सरचिटणीस अभिजित भाऊ पाचोरे, कोपरगावचे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप क्षीरसागर, दिव्यांग क्रांतीचे शरद खिल्लारी नितीन भानसाळी, राकेश दादा भोकरे, शहराध्यक्ष प्रवीण भुजाडे, दीपक पठारे, तालुका कार्याध्यक्ष संदीप काळे, तालुका संघटक नितीन तीपायले, सचिन आरणे, प्रहार महिला सेविका संगीताताई सोनवणे, ज्योतीताई पाठक व मोठ्या प्रमाणात प्रहार सैनिक उपस्थित होते.
श्री.अभिजीत कालेकर यांच्या हस्ते श्री.जालिंदर खिलारी यांची तालुका उपाध्यक्ष नियुक्ती करण्यात आली व शाखा अध्यक्षपदी संदीप लोहकरे यांची निवड करण्यात आली व मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड एडवोकेट खालकर साहेब व पी आय जाधव साहेब यांच्या हस्ते करण्यात आले त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात स्वयंस्फूर्तीने रक्तदान प्रहार सैनिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेली सामाजिक उपक्रम कोपरगावातील  राबविण्यात आले व कोरोना संकटात रक्ताचा तुटवडा भासत असताना रक्तदान करून साजरा करण्यात आला यासाठी प्रहार सैनिकांनी मोलाचे सहकार्य लाभले उपक्रम कोपरगावचे पोलीस निरीक्षक जाधव साहेब यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले व समाजासाठी असे उपक्रम आपण कायम स्वरूपी राबवावेत. अशी त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. जाधव साहेब आपेगावतील भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचे व रक्तदान शिबिराचे तोंडभरून कौतुक  केले अशाच स्वरूपाचे बच्चू भाऊ कडू यांचे विचार सामाजिक उपक्रम आपण राबवता त्यातून समाजातील निराधार लोकांना मदत होती असे त्यांनी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परमेश्वर कराळे, प्रवीण भुजाडे, हरिभाऊ खिलारी, किरण घनगाव, समाधान खिलारी, वैभव खिल्लारी, बापू गव्हाळे, सचिन पाटोळे, दीपक भाऊ गव्हाळे, काकामामा भुजाडे, योगेश खिलारी, सौरभ भुजाडे, शरद गव्हाळे व सर्व प्रहार सेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले व मान्यवरांचे आभार योगेश खिलारी सर यांनी मानले.

No comments:

Post a Comment