देशी दारू वर दरोडा; फरार आरोपी गजाआड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 19, 2021

देशी दारू वर दरोडा; फरार आरोपी गजाआड

 देशी दारू वर दरोडा; फरार आरोपी गजाआड

7 लाख 28 हजार रुपये किंमतीच्या.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोपरगाव मधील शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या 7 लाख 28 हजार रुपये किंमतीच्या देशी दारूची वाहतूक करणार्‍या ट्रक वर दरोडा टाकून लुटणार्‍या टोळीतील प्रमुख फरार आरोपी संतोष गौतम खरात वय 29 वर्षे भोजडे चौकी रा. कोपरगाव या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने एमआयडीसी परिसरात सापळा लावून गजाआड केले आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की ,25 फेब्रुवारी 2021 रोजी शरद गोपीनाथ वरगडे, वय 40 वर्षे, धंदा- ड्रायव्हर,हे त्यांचे ओळखीचे ट्रान्सपोर्ट मालक शैलेश रावल, रा. कोपरगाव यांचे नॅशनल रोड लाईन्स या ट्रान्सपोर्ट मार्फत कर्मवीर श्री. शंकरराव काळे साखर कारखाना येथून 7 लाख  28 हजार रुपये किंमतीची देशी दारु ट्रक नं. एमएच-41 जी-6391 हीमध्ये भरुन विष्णूपूरी, ता. अर्धापूर, जि. नांदेड येथे पोहोच करण्यासाठी जात असताना रात्री 10च्या सुमारास झगडे फाटा येथे आले असता आरोपी संतोष गौतम खरात व त्याचे साथीदार योगेश कैलास खरात, धंनजय प्रकाश काळे, सर्व रा. भोजडे चौकी, ता. कोपरगाव व एक अनोळखी इसम यांनी शरद गोपीनाथ वरगडे यांनी  मारहाण करुन फिर्यादीचे ताब्यातील ट्रक दारुसह बळजबरीने चोरुन नेला होता. सदर बाबत शरद गोपीनाथ वरगडे  यांनी कोपरगांव तालुका पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्ह्यातील मुख्य आरोपी संतोष गौतम खरात हा फरार झालेला होता. सदर फरार आरोपीचा  अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अ.नगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शोध घेत असतानाअनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली फरार आरोपी संतोष खरात हा सह्याद्री चौक, एमआयडीसी, अ.नगर परिसरात आलेला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातीलसोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, दत्तात्रय गव्हाणे, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, परविन्द्र घुंगासे, सागर ससाणे, रोहित येमूल, विजय धनेधर, प्रकाश वाघ, चालक  उमाकांत गावडे अशांनी मिळून एमआयडीसी येथे जावून मिळालेल्या माहितीचे आधारे आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे संतोष गौतम खरात, वय- 29 वर्षे, रा. भोजडे चौकी, ता. कोपरगाव, जि. अ.नगर यांस ताब्यात घेवून कोपरगांव तालुका पो.स्टे. येथे हजर केले असून पुढील कार्यवाही कोपरगांव तालुका पो.स्टे. करीत आहेत.
ही कारवाई मा. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व श्री. संजय सातव साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग, अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment