सभापती काशिनाथ दाते सर यांनी उभा केला विकास कामांचा डोंगर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, July 5, 2021

सभापती काशिनाथ दाते सर यांनी उभा केला विकास कामांचा डोंगर

 सभापती काशिनाथ दाते सर यांनी उभा केला विकास कामांचा डोंगर

भाळवणी 51 लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन !


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः जिल्हा परिषद अहमदनगर  बांधकाम विभाग सभापती काशिनाथ दाते सर यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात सध्या विविध ठिकाणी  विकास कामांचे भूमिपूजन सुरु असून त्या माध्यमातून तालुक्याला विकासाची गती मिळत आहे.  विकासात्मक कामांचा माध्यमातून  दाते सर खर्‍या अर्थानं सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत.  त्यांच्या माध्यमातून तालुक्यात सध्या अनेक विकास कामे मार्गी लागत आहेत.  भाळवणी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन सभापती काशिनाथ दाते सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना दाते सर म्हणाले की शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असताना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम विभागाचा सभापती होण्याचे भाग्य मिळाले त्या माध्यमातून आज मला माझ्या पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेसाठी  अनेक योजना तालुक्यात राबवता येत आहे.
भाळवणी येथे जिल्हा परिषद अहमदनगर नागरी सुविधा योजने अंतर्गत माळवाडी येथे अंतर्गत गटर व रस्ता काँक्रिटीकरण करणे रुपये 24 लक्ष या कामासह रु. 51 लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती  काशिनाथजी दाते सर यांचे शुभहस्ते व पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, माजी सभापती पशु व कृषी समिती बाबासाहेब तांबे, आयोजक शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले, ढवळपुरी गावचे सरपंच डॉ. राजेश भनगडे, या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी भाळवणी सरपंच सौ. लिलाबाई रोहोकले, उप सरपंच संदिप ठुबे, संजय काळे, सोमनाथ भागवत, सिताराम रोहोकले, विजय कुलथे, राजु आंबेडकर, सचिन साठे, दादू पट्टेकर, भास्कर पट्टेकर, बाळासाहेब साठे, संभाजी आमले, संतोष पारख, आब्बास शेख, बुढणभाई शेख, कुटे मेजर, नागेश मंडल, संभाजी आमले, दगडुभाऊ कपाळे, मंजाबापू चेमटे, सोमनाथ भागवत, गायकवाड गुरुजी, लक्ष्मण रोहोकले, पंढरीनाथ रोहोकले, भागुजी रोहोकले, संदिप चेमटे, कामाचे ठेकेदार सागर लोंढे इ. मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here