विद्यार्थ्यांच्या प्रवेशापासून शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील ः सारडा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, July 16, 2021

विद्यार्थ्यांच्या प्रवेशापासून शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील ः सारडा

 विद्यार्थ्यांच्या प्रवेशापासून शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील ः सारडा

वाढदिवसानिमित्त प्रा.मकरंद खरे यांची विद्यालयास मदत


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः हिंद सेवा मंडळाचे जिल्ह्यातील सर्वच शाळेत विद्यार्थ्यांना सर्व समावेशक असे शिक्षण दिले जाते समाजाच्या शेवटच्या घटकातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशापासून ते त्यांच्या शैक्षणिक गरजा कशी पूर्ण होतील हे आवर्जुन पाहिले जाते. यासाठी संस्था, पदाधिकारी, शिक्षक, शाळा प्रयत्नशील असते. केवळ भौतिक सुविधाच नव्हे तर वैयक्तिक अडचणी सोडविण्यासाठी सर्वच प्रयत्नशिल असतात. त्यासाठी प्रसंगी स्वत: आर्थिक सहकार्यासाठी पुढाकार घेतात. आपल्या वाढदिवसानिमित्त प्रा.मकरंद खेर यांनी विद्यालयास आर्थिक मदत देऊन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ केला आहे. सर प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात स्वत:पासून करतात, हा आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे, त्यामुळे इतरांनाही प्रोत्साहन मिळते, असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे माजी कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी केले.
सीताराम सारडा विद्यालयाचे चेअरमन व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रा.मकरंद खेर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यालयास रु. 5 हजारांची मदत दिली. याप्रसंगी माजी कार्याध्यक्ष ब्रिजलाला सारडा, कार्याध्यक्ष अजित बोरा, प्राथमिक शाळेचे चेअरमन मधुसूदन सारडा, मुख्याध्यापक संजय मुदगल, विठ्ठल उरमुडे, पर्यवेक्षिका सौ.अलका भालेकर आदि उपस्थित होते.
याप्रसंगी अजित बोरा म्हणाले, प्रा.खेर हे समाजासाठी आदर्श असून, त्यांच्या शैक्षणिक ज्ञानाचा खरा उपयोग विद्यालयासाठी होती. श्री.मधुसूदन सारडा म्हणाले, प्रा.खेर हे विविध शैक्षणिक उपक्रम विद्यालय व विद्यार्थ्यांसाठी राबवित असतात. एक चिरतरुण असे व्यक्तीमत्व म्हणून समाज त्यांच्याकडे पाहतो. या मदतीद्वारे चांगली सुरुवात केली केली आहे.
यावेळी प्रा.मकरंद खेर म्हणाले, शाळा-संस्था हीच माझी ओळख असून, शैक्षणिक कार्य माझ्या हातून घडते याचे मला समाधान आहे. ही मदत मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी करत असून, कोणत्याही कामाची सुरुवात स्वत:पासून करावी, यावर माझा विश्वास आहे. शाळेत विविध उपक्रम राबवितांना संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य मिळत असल्याने आपला उत्साह वाढतो, असे सांगितले.
प्रास्तविक व स्वागत मुख्याध्यापक संजय मुदगल यांनी केले. सौ.नंदा कानिटकर, श्रीमती क्रांती मुंदानकर, दिपक शिरसाठ आदिंनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सौ.ऋषाली जोशी यांनी केले तर आभार सौ.अलका भालेकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here