लसीकरण केंद्रावरील...गोंधळ थांबवा! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 7, 2021

लसीकरण केंद्रावरील...गोंधळ थांबवा!

 लसीकरण केंद्रावरील...गोंधळ थांबवा!

पालकमंत्री हसन मुश्रीफांचे आवाहन
अहमदनगर जिल्ह्यात फक्त 6% नागरिकांचे लसीकरण.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यात 38 लाख 86 हजार 576 जणांना लसीकरणाचे उद्दीष्ट आहे. यापैकी 7 लाख 70 हजार 715 जणांना पहिला डोस दिला आहे. तर, 2 लाख 24 हजार 874 जणांना दुसरा डोस मिळाला आहे. याचाच अर्थ जिल्ह्यात फक्त सहा टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. केंद्र सरकारने लस कंपन्यांना 25 टक्के लस खाजगी रुग्णालयांना विकण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे ज्यांची ऐपत आहे, त्यांनी विकत लस घेऊन लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यास हातभार लावावा. हे उद्दिष्ट पूर्ण करत असतानाच लसीकरण केंद्रावर जो गोंधळ होत आहे. तो थांबवून लसीकरण केंद्रावर सुसूत्रता आणण्याचे आवाहन नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
मुश्रीफ हे आज नगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना व लसीकरण याच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. श्री मुश्रीफ पुढे म्हणाले की, नगर जिल्ह्यामध्ये फक्त सहा टक्के नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीचा अपुरा पुरवठा होत असल्यामुळे अपेक्षित वेगाने लसीकरण होत नाही. जोपर्यंत 70 टक्के नागरिकांचे लसीकरण होणार नाही, तोपर्यंत संपूर्ण अनलॉक शक्य नाही.जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. तिसर्‍या लाटेची भिती व्यक्त होत आहे. या लाटेला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात पुरेपुर तयारी करण्यात आली आहे. 14 ऑक्सिजन प्लांट, लहान मुलांसाठी स्वतंत्र वार्ड, बेडची संख्या दुप्पट ते तिप्पट करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले. जिल्ह्यात पहिल्या लाटेत 75 हजार रुग्ण आढळले असून 1 हजार 143 जणांचा मृत्यू झाला. तर, दुसर्‍या लाटेत तब्बल 2 लाख 6 हजार रुग्ण आढळले, तर या लाटेत 4 हजार 997 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही मुश्रीफ यांनी दिली. विधानसभा अधिवेशनाबाबत प्रश्न विचारता मुश्रीफ म्हणाले. भाजपला सत्तेत येण्याची घाई झाल्यामुळे विधीमंडळात गोंधळ घालणे, तालिका अधिकार्यांना अपशब्द वापरणे असे प्रकार करण्यात येत आहेत. प्रतिविधानसभा हा त्यातीलच एक प्रकार आहे, असेही ते म्हणाले.शिर्डी देवस्थानवर विश्वस्त नियुक्त करतांना त्यांना कोणत्याही क्षेत्रातील दहा वर्षाचा अनुभव असावा असे निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत. दहा ऐवजी पाच वर्षांचा अनुभव असावा असे सरकारचे प्रयत्न आहेत. त्यासाठी कार्यवाही सुरु असुन 31 जुर्लपर्यंत विश्वस्त मंडळ नियुक्त करण्यात येईल असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. या बैठकीला आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिल पोखरणार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment